Mahakumbh 2025 Grah Yog saam tv
राशिभविष्य

Mahakumbh 2025 : तब्बल १४४ वर्षांनी जुळून आलाय महाकुंभमेळ्याचा योग; 'या' राशींचे सोन्यासारखे दिवस होणार सुरु

Mahakumbh 2025 Grah Yog: महाकुंभ केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे. शास्त्रानुसार, यावेळी 144 वर्षांनंतर महाकुंभावर एक अद्भुत योगायोग घडणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आजपासून प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. यंदाचा म्हणजेच 2025 चा महाकुंभ खूप खास आहे. याचं कारण म्हणजे हा महाकुंभ केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे. शास्त्रानुसार, यावेळी 144 वर्षांनंतर महाकुंभावर एक अद्भुत योगायोग घडणार आहे.

13 जानेवारीपासून ते २६ फेब्रुवारीपर्यंत हा कुंभमेळा सुरु असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार 144 वर्षांनंतर महाकुंभावर सूर्य, चंद्र, शनि आणि गुरू यांची एकत्र स्थिती शुभ ठरणार आहे. यासोबतच पौर्णिमा, रवि योग आणि भाद्रव योगही तयार होतोय. हे संयोजन समुद्र मंथनाच्या वेळी देखील घडलं होतं. त्यामुळे या गोष्टी अत्यंत पवित्र आणि शुभ मानल्या जातायत. देवगुरु गुरु वृषभ राशीत आणि ग्रहांचा राजा सूर्य मकर राशीत असतो तेव्हा महाकुंभ होतो. या काळात गुरुची दृष्टी सूर्यावर पडत असल्याने हा काळ अतिशय शुभ आहे.

दर 12 वर्षांनी ज्यावेळी गुरु ग्रह 12 राशींचा प्रवास पूर्ण करतो आणि वृषभ राशीत परततो त्यावेळी महाकुंभ आयोजित करण्यात येतो. जेव्हा हे चक्र १२ वेळा पूर्ण होतं म्हणजेच १४४ वर्षांनी तेव्हा पूर्ण महाकुंभ होतो. अशा स्थितीत 144 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोगामुळे काही राशींवर शुभ प्रभाव पडणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मेष रास

ज्योतिष शास्त्रानुसार, यावेळी महाकुंभ दरम्यान मेष राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढणार आहे. मोठी उद्दिष्टं साध्य करण्यात यश मिळू शकणार आहे. व्यवसायातही मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्ह आहेत.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांनाही या काळात लाभ मिळू शकणार आहेत. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळणार आहे. या काळात तुम्हाला प्रलंबित पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. पगारात वाढ होण्याची लक्षणं आहेत. कोणत्याही विशेष कामात यश मिळू शकतं.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्यवान ठरणार आहे. मकर राशीच्या लोकांना शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना रोजगार मिळू शकतो. नवीन काम हाती येणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बदलापूर नगरपालिकेमधील स्वीकृत नगरसेवकचा तिढा सुटला

Manoj Jarange : मनोज जरांगेंना गोळ्या घालणार, धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग...

Latur Crime: आयकर अधिकाऱ्याची मुलाने केली हत्या, पोटात चाकू भोसकला; धक्कादायक कारण समोर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी; लाखो महिलांचा लाभ बंद; तुम्हाला जानेवारीचे ₹१५०० येणार की नाही? वाचा सविस्तर

दरवाजावर बॉक्स डिझाइन का असतं तुम्हाला माहितीये का? पाहा कारण

SCROLL FOR NEXT