Daily Horoscope Today 14th July 2024 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : आज या ५ राशींच्या लोकांवर होणार भगवंताची कृपा; इच्छा आकांक्षा होतील पूर्ण, वाचा राशीभविष्य

Rashi Bhavishya Today 14 July 2024 : आज रविवार अष्टमी. नक्षत्र - चित्रा. योग. राशीचक्रानुसार, जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांचे राशीभविष्य....

Anjali Potdar

आजचे पंचांग - रविवार दिनांक - १४ जुलै २०२४

आषाढ शुक्लपक्ष. तिथी - अष्टमी. नक्षत्र - चित्रा. योग - शिव. करण- बव . रास -कन्या ०८.४३ नंतर तूळ. दिनविशेष - चांगला दिवस.

मेष : कामासाठी प्रवास होतील

नवीन काही व्यवसाय सुरू करणार असाल तर आजचा दिवस चांगला आहे. भागीदारीमध्ये व्यवसाय लाभदायक ठरेल. कामासाठी प्रवास होतील. दिवस चांगला जाईल.

वृषभ : अचानक धनलाभाची शक्यता

पैशाचे मार्ग सुकर होतील. अचानक धनलाभाची शक्यता आहे. शरीर स्वास्थ्य जपा. महत्त्वाच्या गोष्टी पुढे ढकलल्या तर बरे राहील.

मिथुन : भगवंताची भक्ती करा

वडिलांचे सौख्य लाभेल. त्यांच्या कामाचेही सुख मिळेल. एकूण अलबेल आणि चांगला दिवस राहणार आहे. भगवंताची भक्ती करा. विशेष फळ लाभेल.

कर्क : आपले वजन वाढेल

आपल्या राशीला प्रवास आणि भ्रमंती आवडते त्याच दृष्टीने आज कामे घडतील. ऑफिसमध्ये केलेल्या कामाचे आपले वजन वाढेल. सहकाऱ्यांना बरोबर घेऊन चला.

सिंह : आपलेपणाची भावना वाढेल

जुने मित्र भेटतील. आपलेपणाची भावना जास्त वाढेल. कुठल्याच गोष्टीची इच्छा राहणार नाही. सर्व मनातल्या गोष्टी पूर्ण होतील. दिवस चांगला जाईल.

कन्या : मनस्वास्थ्य जपणे चांगले

काही आजार असतील तर आज त्याचे निदान होईल. प्रवासाचे मोठे बेत आखले जातील. मनस्वास्थ्य जपणे हे आजसाठी चांगले राहील.

तूळ : व्यक्तिमत्व विकास होईल

स्वतःच्याच प्रेमात पडण्याचा आजचा दिवस आहे. आयुष्य कृतकृत्य वाटेल. सकारात्मकता वाढेल. व्यक्तिमत्व विकास होईल.

वृश्चिक :काम करा, कष्ट करा

कुठेही आज जामीन वा साक्षीदार राहू नका. आपल्यासाठी धन मिळवण्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. काम करा कष्ट करा आणि धनसंचय करा.

धनु : खुश होऊन जाल

मेहनतीचे सुख काय आहे हे आज कळेल. शरीर स्वास्थ्य याकडेही विशेष लक्ष द्याल. स्वतःवरच खुश होऊन जाल. दिवस चांगला जाईल.

मकर : संधीचे सोने कराल

जागेचे व्यवहार होतील. नवीन गोष्टींमध्ये पैसे गुंतवाल. घरामध्ये बदल करण्याची इच्छा होईल. आलेल्या संधीचे सोने कराल.

कुंभ : उपासना फलदायी ठरेल

संतती सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. धनयोग आहेत. शेअर्समध्ये पैसे गुंतवायला हरकत नाही. आपल्या आराध्य दैवतेची उपासना फलदायी ठरेल.

मीन : कोणाच्या वाटेला जाऊ नका

तब्येतीच्या तक्रारी जाणवतील. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. विनाकारण कोणाच्या वाटेला जाऊ नका. त्रास वाढतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

Marathi bhasha Vijay Live Updates : कोणाची माय व्यायली त्यांनी मुंबईला हात लावून दाखवावा - राज ठाकरेंचा इशारा

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT