Anjali Potdar
आषाढ शुक्लपक्ष तिथी - सप्तमी. नक्षत्र - हस्त. योग - शिव. करण - वणिज. रास - कन्या. दिनविशेष - चांगला दिवस
नोकरी आणि नोकर दोघांपासून आज सावध राहण्याचा दिवस आहे. त्रास डोके वर काढतील. प्रवास विनाकारण होतील आणि त्यामधूनही त्रास होतील. सगळ्या गोष्टींची काळजी घ्या असा सावधगिरीचा इशारा.
रसिक लोकांच्या राशीमध्ये रसिकता ठासून भरलेली असते. आज अशाच गोष्टी तुम्ही करणार आहात. आपल्यामध्ये कला असेल तर ती बहरेल. प्रेम प्रणयासाठी आजचा दिवस सुसंधी घेऊन आलेला आहे. दिवस छान जाईल.
खिल्लारबाजी आपल्याकडे हा गुण आहे. त्याच्यावर जरा कंट्रोल करा. घराकडे लक्ष द्या. आपल्या आतील गुण विकसित करण्याचा प्रयत्न करा. दिवस बरा जाईल. जबाबदारी स्वीकारा.
नको त्या गोष्टीत मन अडकण्यापेक्षा स्वतःवर लक्ष केंद्रित केल्यास आपली कीर्ती वृद्धिंगत होईल. काम वाढवा आणि त्यात झोकून द्या. असा आजचा संदेश आहे. भावंडांचे प्रेम मिळेल.
अनेकदा " आयत्या बिळावर नागोबा" अशी आपली स्थिती असते. इतरांकडून काम घेण्यात करून घेणार आपण वाकबगार आहात. आजही अशाच काही गोष्टी होतील. पण बरोबर येणे घरच्या जबाबदारी उचलाव्या लागतील. पैशाची निगडित व्यवहार होतील.
बुद्धिमत्ता ठासून भरलेली आपली रास आहे. नम्र आणि मौन बाळगणारी. असेच आज स्वतःवर लक्ष केंद्रित करणार आहात आणि वाचन, लेखन यात मन रमवाल. सकारात्मकता वाढेल. दिवस चांगला आहे.
खर्च होतो म्हणण्यापेक्षा तुमच्याकडून खर्च केला जातो. आज त्याच्यावर नियंत्रण मिळवा. विनाकारण खर्च होत नाही ना याचा हिशोब ठेवा. मोठे बेत आखणार असाल तर ते रद्दच केलेले बरे.
धीर गंभीर असणारी आपली रास तेवढीच भावनिक सुद्धा आहे. या दोन्हीचा संगम आज आपल्यामध्ये असणार आहे. सर्वांच्या सहकार्याने पुढे जाल. ज्यांनी ज्या गोष्टी दिल्या आहेत त्याची परतफेड कराल. ते क्षण साजरे कराल.
ताकतीच्या जोरावर इथपर्यंत आला आहात तीच ताकद शेवटपर्यंत नेटाने ठेवायची आहे. म्हणून कामांमध्ये लढवय्या बनवून काम करत राहिलात तर आज यश तुमचेच आहे हे नक्की लक्षात ठेवा. प्रवासाचे योग येतील.
शनि महाराजांची देण आज भाग्य फळफळू देणार आहे. खूपदा "लेट पण थेट" अशा गोष्टी आपल्या राशीला मिळतात. तोच आजचा दिवस आहे. ज्या संधी येतात त्याच्याकडे डोळे उघडून बघा आणि त्या मिळवा.
संशोधनात्मक काही गोष्टी आपल्याकडून घडतील. गुढ गोष्टी किंवा एखाद्याचे पितळ उघडे पाडणे या गोष्टी आज आपल्याला जमतील. स्वतःला त्रास न करून घेता सावधगिरीने पावले टाका.
समाधान सगळ्याच गोष्टीत बाळगून चालत नसते. व्यवसाय, व्यापार वृद्धिंगत राहायचे असतील तर दुपटीने मेहनत करावी लागते. आज असाच दिवस आहे कडक आणि कणखर राहा. तरच यश मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.