Horoscope Today 16th August 2024 Saam TV
राशिभविष्य

Friday Horoscope : सूर्याचा आज मघा नक्षत्रात प्रवेश, मेषसह 5 राशीच्या लोकांचे भाग्य उजाडणार, वाचा राशीभविष्य

Rashi Bhavishya Today 16th August 2024 : आज ग्रहांचा राजा सूर्य हा मघा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे ग्रहमानात बदल होऊन काही राशीच्या लोकांचं भाग्य बदलणार, वाचा आजचे राशीभविष्य...

Anjali Potdar

आजचे पंचांग शुक्रवार १६ ऑगस्ट २०२४

श्रावण शुक्लपक्ष, पुत्रदा एकादशी, वरदलक्ष्मी व्रत. तिथी - एकादशी ०९|४० रास - धनु. नक्षत्र - मूळ. योग - विष्कंभ. करण - विष्टि. दिनविशेष - १० नंबर चांगला.

मेष : अंदाज अचूक ठरतील

आजचा दिवस छान सुसंधी घेऊन आलेला आहे. पुत्रदा एकादशीची विशेष उपासना करा. धार्मिक कार्यामध्ये सहभाग राहील. तुम्ही घेतलेले निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. त्यामुळे अनेक शुभेच्छा.

वृषभ : कामे पुढे ढकला

ठरवेल तसं होईलच असा आजचा दिवस नाही. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. जमेल सगळं पण मनाची ताकद कमी पडते. आज आपले मनोबल कमी राहील त्याच्यावर विशेष काम करा.

मिथुन : आज फायदा होईल

भागीदारीमध्ये, व्यवसायामध्ये सुयश लाभेल. आधी केलेल्या कामांचे अनुभवाचा आज फायदा होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रवासाचे योगही दिसत आहेत.

कर्क : मार्ग काढावा लागेल

कितीही केला तरी पालथ्या घडावर पाणी असा दिवस कधीकधी असतो. आज तोच दिवस आहे. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. यातून मार्ग काढावा लागेल.

सिंह : विष्णू उपासना करावी

आर्थिक क्षेत्रामध्ये धाडस करायला हरकत नाही. आरोग्य चांगले राहील. एकादशीची विशेष विष्णू उपासना करावी. पैशाची निगडित व्यवहार आणि गुंतवणूक आज फायदेशीर ठरेल. दिवस चांगला आहे.

कन्या : गडबडीचा दिवस राहील

कामाच्या ठिकाणी सुयश मिळेल. सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल. धावपळ आणि गडबडीचा दिवस राहील. प्रवासाचे योग येतील आणि ते सुखकर असतील.

तूळ : महत्त्वाची जबाबदारी अंगावर येईल

मन आनंदी आणि आशावादी राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर येऊन पडेल. आणि ती योग्यरित्या निभावूनही जाल . शेजाऱ्यांची विशेष मदत मिळेल.

वृश्चिक : गुंतवणूक फायदेशीर ठरेल

कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधणारा आजचा दिवस आहे. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नोकरीमध्ये समाधानकारकरीत्या स्थिती राहील.

धनु : दिवस आपलाच आहे

दैनंदिन कामे मार्गे लागतील. हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल. आपले व्यक्तिमत्व उजळून काढणारा आजचा दिवस आहे. फक्त कामाच्या ठिकाणी द्विधा मनस्थिती ठेवू नका. दिवस आपलाच आहे.

मकर : वस्तूंची खबरदारी घ्या

मानसिक अस्वस्थता जाणवेल आपल्या वस्तूंची विशेष खबरदारी घ्या. त्या गहाळ होणार नाहीत ना याची दक्षता घ्या. विनाकारण होणारा खर्च टाळा.

कुंभ : नवीन परिचय होतील

अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्र-मैत्रिणी विषयी विशेष प्रेम वाटेल. नवीन परिचय होतील. दिवस छान आहे.

मीन : नवे मार्ग सापडतील

नोकरी व्यवसायामध्ये समाधानकारक स्थिती राहील. नवीन दिशा, नवे मार्ग सापडतील घेतलेल्या कामांमध्ये धडाडीने पुढे जाल. सामाजिक क्षेत्रातही प्रगती तसेच राजकारणात यश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

Nanded: साखरझोपेत आभाळ फाटलं; ६ गावांना पुराचा वेढा, ४०-५० म्हशींचा मृत्यू, थराराक VIDEO

Balasaheb Thorat : काही शक्तींकडून संगमनेरची संस्कृती बिघडवण्याचे काम; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

TET Exam Result: महत्त्वाची बातमी! आज टीईटी परीक्षेचा निकाल| VIDEO

इंग्लडचं मैदान गाजवलं, पण आशिया कपमधून गिलला मिळणार डच्चू? अजित आगरकरांच्या मनात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT