आजचे संपूर्ण राशी भविष्य
Rashi Bhavishya Today 23 June 2024 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : या राशींच्या लोकांना होतील अनेक लाभ, दिवस मनासारखा जाईल, वाचा आजचे संपूर्ण राशी भविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग - दिनांक २३ जून २०२४.

वार - रविवार तिथी- ज्येष्ठ शुक्ल द्वितीया. नक्षत्र - पूर्वाषाढा . योग -ब्रम्हा. करण - तैतील. रास - धनु २२.४८ नंतर मकर. दिनविशेष - चांगला दिवस.

मेष : धर्माची धुरा पुढे न्याल

आपल्या राशीचा स्वभाव खरंतर उमदा, साहसी आणि धाडसी आहे. अशाच काही गोष्टी आज मनामध्ये येतील. नवीन कुठे पर्यटनाला जाण्याचे विचार असतील तर त्यावर आज कार्य करा. आपल्या धर्माची धुरा पुढे न्याल. दिवस चांगला.

वृषभ : खिळ लागल्यासारखे होईल

आपली रास खरंतर कलाकाराची रास, कलंदर रास. सहजगत्या आयुष्याचा आनंद लुटायला आवडतो. पण आज या गोष्टीला थोडी खिळ लागल्यासारखे होईल. मनासारख्या गोष्टी घडणार नाहीत. तब्येत जपा.

मिथुन : मनासारख्या गोष्टी घडतील

आपल्या राशीला हसत खेळत सहज सगळ्या गोष्टी केलेल्या आवडतात. नाठाळ अशी आपली रास आहे. आज असाच दिवस हसता खेळता राहील. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. मनासारख्या गोष्टी घडतील.

कर्क : मनस्ताप करून घेऊ नका

आपल्या राशीला उगाचच मनाचे हळवे पण येते. इतरांचे करून आपल्या वाट्याला काही येत नाही अशी भावना येते. आज खरच ही भावना जास्त वाढेल. त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. मनस्ताप करून घेऊ नका.

सिंह : पैशांशी निगडित व्यवहार होतील

खरंतर उमदी आणि दिलदार अशी आपली रास आहे. आपल्यामुळे इतरांना फायदा होतो. असाच आजचाही दिवस राहणार आहे. तुमच्या बरोबर इतरांनाही तुम्ही आनंद द्याल. पैशांशी निगडित व्यवहार होतील. संतती सौख्य लाभेल.

कन्या : द्विधा मनस्थिती ठेवू नका

आपली राज बौद्धिक रास आहे. काही गोष्टी बुद्धिमत्तेने आपण वाट काढण्यामध्ये माहीर आहात. आज असेच काही व्यवहार तुमच्याकडून होतील आणि त्याचे तुम्हाला समाधान लाभेल. फक्त द्विधा मनस्थिती ठेवू नका.

तूळ : दिवस मनासारखा आहे

शुक्राची रास. फिरायला आवडते आणि आज असे जवळचे प्रवास घडून येतील. भावंडांचे सौख्य राहील. पैशाची आवक- जावक चांगली राहिल्यामुळे दिवस मनासारखा आहे.

वृश्चिक : मिळून मिसळून वागा

आपली इतरांना दहशत असते. अबोला हा आपले शस्त्र आहे. विनाकारण घरामध्ये दहशत आणू नका. वातावरण हलके ठेवा. कुटुंबीयांशी मिळून मिसळून वागण्याचा आजचा दिवस आहे.

धनु : आपल्यातील गुण वाढतील

अर्धा घोडा अर्धा माणूस असा आपला स्वभाव आहे. लहरी मोहम्मद म्हटलं तरी सुद्धा चालेल. पण तरीसुद्धा गुरुच्या अंमलाखाली असणारी रास आपण समाधान मानणार इतरांना दुखावणार नाही हे आपले गुण आज वाढीस लागणार आहेत.

मकर : विनाकारण खर्च टाळा

आधीच पैशाला चिकट आणि कंजूस असणारी आपली रास. आज विनाकारण पैसा खर्च केल्यामुळे मनस्ताप वाढेल. काही घटना या बंधनकारक ठरतील आणि हे योग टाळावेत .

कुंभ : आज अनेक लाभ होतील

आपल्या राशीचा विचार केला तर संशोधनात्मक रास आहे. जुन्या आठवणी, गाठीभेटी या आपल्याला जवळ ठेवायला आवडतात. त्याच्यामधून अनेक लाभ होण्याची आज शक्यता आहे. ओळखींचा वापर होईल किंवा फायदा होईल.

मीन : समाधानाचा मार्ग मिळेल

देवभोळी असणारी आपली रास. माशाप्रमाणे साधा स्वभाव. पण काही वेळेला अशाच लोकांना आयुष्यामध्ये चांगल्या संधी पुढे मिळतात. तोच आजचा आपला दिवस आहे आपला साधेपणा जपून ठेवा. समाधानाचा मार्ग नक्की मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates : नागपुरातील पाटणसावगीत धुमाकूळ घालणाऱ्या वानराला केलं रेस्कू

Worli Hit And Run: वरळीत 'हिट अँड रनचा थरार, भरधाव कारच्या धडकेत पती-पत्नी हवेत उडाले, भीषण अपघाताचा VIDEO समोर

CM Eknath Shinde News: लोकसभा निवडणुकीत गाफिल राहिलो, मुख्यमंत्री शिंदे यांची कबुली

Mumbai Local Train : ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कसारा-आसनगाव लोकलसेवा ठप्प

Late Night Sleeping Side Effects : रात्री एक पर्यंत जागे राहाल तर आरोग्यावर गंभीर परिणाम, वाचा उशिरा झोपण्याचे तोटे

SCROLL FOR NEXT