Today's Rashi Bhavishya 12th June 2024, Horoscope Today Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : आळस झटका अन् कामाला लागा; मेषसह १२ राशींच्या नशिबात आज काय लिहलंय? वाचा राशी भविष्य

Rashi Bhavishya Today : आजचे राशी भविष्य, बुधवार १२ जून २०२४, या राशीच्या लोकांनी आज आळस झटकून कामाला लागावे. तुमच्या नशिबात आज काय लिहलंय, जाणून घ्या...

Anjali Potdar

आजचे पंचांग दिनांक १२ जून २०२४

वार - बुधवार. तिथी - ज्येष्ठ शुक्ल षष्ठी. नक्षत्र - मघा. योग - हर्षण. करण - कौलव. रास - सिंह. दिनविशेष - चांगला दिवस.

मेष स्वतःचा मार्ग ओळखाल

आपल्या राशीला काही देवाचे वावडे नाही. योग्य असेल तर आपण धार्मिक गोष्टी सहभाग सुद्धा घेता. आजच तो दिवस आहे. हितशत्रूंवर मात कराल आणि स्वतःचा मार्ग स्वतःच ओळखाल.

वृषभ : विचार मंथन कराल

राजकीय क्षेत्रामध्ये सहभागी व्हाल. सामाजिक क्षेत्राचा आवाका मोठा आहे हे जाणून त्याविषयी विचार मंथन कराल. महत्त्वाच्या बैठका, गाठीभेटी आज पार पडतील.

मिथुन : अनेक लाभ मिळतील

मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभणार आहे. जेठ्यांचे आशिर्वाद तर कनिष्ठांच्या बरोबर गट्टी असा आजचा आपला दिवस आहे. अनेक प्रकारचे लाभ मिळतील.

कर्क : प्रवास शक्यतो टाळावेत

पैशांशी निगडित व्यवहार आज सांभाळून करा. प्रवास शक्यतो टाळावेत. विनाकारण खर्च टाळावा. अध्यात्मकडे कल ठेवल्यास दिवस चांगला राहील. मनस्थिती सांभाळा.

सिंह : आळस झटका अन् कामाला लागा

वरिष्ठांचे सहकार्य लाभणार आहे. साडेसाती असूनही आपली मानसिक अवस्था दिवसेंदिवस चांगली होत आहे ही भावना येईल. मनोबल वाढवणारी घटना घडेल आळस झटका आणि कामाला लागा.

कन्या : जुनी येणी वसूल होतील

पैशाची निगडित आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आवकजावक चांगली राहील. जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधा.

तुळ : छोटे प्रवास घडतील

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरी व्यवसायामध्ये समाधानकारक परिस्थिती राहणार आहे. छोटे प्रवास घडतील.

वृश्चिक : घरातल्यांचे सहकार्य मिळेल

कामानिमित्त प्रवास होतील. तुमचे निर्णय अचूक व अंदाज बरोबर ठरतील. घरातल्यांचे सहकार्य मिळेल. पण एकट्यानेच कामाची दोरी पुढे ओढवी लागणार आहे.

धनु : दत्त उपासना करा.

कलाक्षेत्रात आपलं कार्यक्षेत्र रुंदावणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. अध्यात्मिक प्रगती, उपासनेमध्ये जास्त समाधान वाटणार आहे. दत्त उपासना करा.

मकर : वाहने जपून चालवा

वाहने जपून चालवा. आरोग्य संभाळा. नोकरीमध्ये समाधान मिळवाल तर हाताखालचे लोक मात्र त्रास देतील.

कुंभ : इतरांवर प्रभाव राहील

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सहकारी व्यावसायिक जोडीदार आपला आदेश पालन करतील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठी आजचा दिवस चांगला.

मीन : विनाकारण कटकटी वाढतील

खर्चाचे प्रमाण वाढेल. विनाकारण त्रास कटकटी यांचा आलेख चढता राहील. आर्थिक निर्णय महत्त्वाचे असतील तर त्या गोष्टी आज न केलेल्याच बऱ्या होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT