Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Daily Horoscope: अनेक राशींसाठी यशाचा दिवस ठरेल रविवार; घडेल प्रवास,उजळेल भाग्य

Horoscope 10 November 2024: आज काही राशींच्या लोकांचे दिवसभरात खर्चाचे प्रमाण वाढते राहणार आहे. वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलं?

Anjali Potdar

रविवार,१०नोव्हेंबर २०२४,कार्तिक शुक्ल पक्षया,कूष्मांड नवमी.

तिथी-नवमी २१|०२

रास- कुंभ

नक्षत्र-धनिष्ठा

योग-ध्रुव

करण-बालव

दिनविशेष-चांगला दिवस

मेष

मनस्वास्थ्य चांगले राहील. योग्य-अयोग्य या गोष्टींचे उशिरा का होईना आज भान येईल. मित्रांमध्ये आपली वाहवा होईल. सर्वांवर प्रेमाचा वर्षाव आपल्याकडून होईल.

वृषभ

कामाचे घोडदौड योग्य दिशेने चालू राहणार आहे. आपल्या वरिष्ठांच्या कडून आपले विशेष अभिनंदन होईल. आपल्याला पाण्यात बघणाऱ्या लोकांपासून सावध रहा. प्रवासाचे योग आहेत.

मिथुन

दूरदेशी जाणे, प्रवासाला जाणे या गोष्टींची आखणी कराल. देहापासून दिव्यत्वाचा आजचा प्रवास सद्गुरूंचा कृपेने सुखाचा राहणार आहे. विष्णू उपासना फलदायी ठरेल.

कर्क

प्रेमामध्ये अपयश मिळेल. खूपदा अति भावनिक राहण्यामुळे होणारे त्रास आपल्याला जाणवतात हे आजही लक्षात येईल. शारीरिक आणि मानसिक व्यर्थ दगदग टाळा.

सिंह

कोर्टाच्या कामामध्ये यश मिळेल. मित्रांच्या कडून सहकार्याची अपेक्षा आहे. नवीन कामे मिळतील. भागीदाराकडून कामाचे नवीन प्रस्ताव येतील.

कन्या

पोटाची दुखणे डोके वर काढतील. गुप्त शत्रू त्रास देतील. आपले कोण आणि परके कोण हे खास करून ओळखण्याचा आजचा दिवस आहे. द्विधा मनस्थिती टाळा.

तूळ

"प्रेमा तुझा रंग कसा" हे ओळखण्याचा आजचा दिवस आहे. प्रेमात उंच भराऱ्या घ्याल. विविध मनोरे बांधाल. स्वप्नवत जग राहील. दिवसाचा आनंद लुटाल. खरे प्रेम प्राप्त होईल.

वृश्चिक

गाई -गुरे यांच्यापासून आज फायद्याचा दिवस आहे. यांची विशेष खरेदी विक्री होऊ शकेल. शेतीच्या कामांतून चांगला फायदा होईल. पैशाची साठवणूक होईल.

धनु-

"उंच माझा झोका" चा आजचा दिवस आहे. इतरांपेक्षा वरच्या क्रमावर राहुन सर्व निरीक्षण कराल .देवाने आपल्याला दिलेल्या गोष्टींविषयी कृतकृत्य रहाल.

मकर

कुटुंबीयांची मित्रांची जबाबदारी उचलावी लागेल. सगळ्याच गोष्टींचा मध्य पैसा आहे हे आज जाणवेल. जसा येतो तसा जातो. पण आजच्या दिवशी गुंतवणूक करणे हे जास्त श्रेयस ठरेल.

कुंभ

आपले व्यक्तिमत्व मुळातच छान आहे. आज आपली मानसिकता सुद्धा सुंदर असल्यामुळे या व्यक्तिमत्त्वाला विशेष झळाळी येईल. इतरांवर आपला प्रभाव राहील. दिवस आनंदी राहील .

मीन

प्रवासाची दगदग वाढती राहील. रोग आणि आजारांवर आज खर्चाचे प्रमाण दिसते आहे. विनाकारण दवाखाने मागे लागतील. मानसिक स्वास्थ जपावे लागेल. डॉक्टरांचा सल्ला ऐकावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत सिद्धिविनायक दर्शनासाठी दाखल

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

SCROLL FOR NEXT