Daily Horoscope Today Marathi  Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: शुक्रवार ठरेल प्रेमाचा दिवस; जुळेल मन,भेटतील मित्र; जाणून घ्या कोणासाठी असेल आज 'लकी डे'

Horoscope Today in Marathi : आजचा दिवस अनेकांसाठी आनंदाचा असणार आहे. कोणाचे प्रेम जुळणार तर काहींना आर्थिक लाभ होणार आहे. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल? हे जाणून घेऊ.

Anjali Potdar

शुक्रवार,२१ फेब्रुवारी २०२५,माघ कृष्णपक्ष.

तिथी- अष्टमी ११|५८

रास- वृश्चिक

नक्षत्र- अनुराधा

योग- व्याघात

करण- कौलव

दिनविशेष- १६ प. चांगला

मेष - लहान मुलांना तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. अपघात आणि अग्नीपासून धोका संभवतो आहे. गुढ विषयाविषयी ओढ वाढेल. दिवस संमिश्र आहे .

वृषभ - दूरच्या प्रवासाच्या दृष्टीने नियोजित बैठक आज पार पाडाल. व्यवसायाच्या क्षेत्रात आघाडीवर राहाल. प्रेमात यश मिळेल. जिद्दीने नातेसंबंध प्रस्थापित कराल.

मिथुन - फुफ्फुसाशी निगडित आजार, खोकला, दमा या गोष्टींपासून आज काळजी घ्यावी. कामाच्या बाबतीत भाग्यकारक घटना घडून येताना दिसते आहे. मात्र आपल्याच लोकांपासून त्रास संभवतो आहे.

कर्क - क्रीडा क्षेत्रात चांगली मजल माराल. प्रेम प्राणयाच्या दृष्टीने दिवस फुलणारा आहे. नव्याने प्रस्ताव ठेवायला आज हरकत नाही. शेअर्समधील गुंतवणूक फायद्याची ठरेल.

सिंह - पाळीव प्राणी, दुग्ध व्यवसाय, यामधून विशेष धनप्राप्तीचे आज योग आहेत. घरातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आज आपल्याला उचलाव्या लागतील. योग्य प्रकारे त्या पारही पाडाल. दिवस संमिश्र आहे.

कन्या - जिद्द आणि चिकाटीमुळे प्रगतीची वाटचाल कराल. बौद्धिक दर्जा उजळून निघेल. आपल्या वक्तृत्वावर आजूबाजूचे लोक भाळून जातील. दिवस चांगला आहे.

तुळ - जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी लागेल. धनाची आवक जावक चांगली राहील ठरवलेल्या गोष्टी मनाप्रमाणे पार पडतील. खाद्यपदार्थांमध्ये विशेष रुची वाढेल.

वृश्चिक - आत्मविश्वासाने भरलेला आजचा दिवस आहे. आपले व्यक्तिमत्व खुलून येईल. आज आरशाची गरज राहणार नाही, असा दिवस प्रभावीपणे सहज घालवाल. दिवस चांगला आहे.

धनु - कधी कधी आपल्या स्वभावाचा आपल्यालाच त्रास होतो. मनस्तापाचा दिवस आहे. द्विधामनस्थिती टाळून अध्यात्माची कास धरावी लागेल. मोठे प्रवास आणि त्यामधून मिळणारे फायद्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

मकर - जुनी मैत्री, जुने नातेसंबंध दृढ होतील. गुंतवणूक फळाला जाईल. जवळच्या व्यक्तींबरोबर स्नेहभोजनाचे योग आहेत.दिवस सार्थकी लागेल.

कुंभ - प्रेमाला अनेक वाटा आहेत. विनाकारण आज याच्यामध्ये कटकटी उत्पन्न होतील. विशेषत्वाने आपल्या कार्यक्षेत्रावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यामध्ये मात्र यश मिळेल.

मीन - सद्गुरूंची विशेष कृपा आज राहणार आहे. दत्त उपासना फलदायी ठरेल. दानधर्म आणि दानत आज चांगली ठेवा. भाग्यकारक घटना घडतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT