Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : आज पैशांच्या मागे लागू नका; तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

Anjali Potdar

आजचे पंचांग

सोमवार,२१ ऑक्टोबर २०२४, अश्विन कृष्णपक्ष.

तिथी-पंचमी २६|३०

रास- वृषभ १८|१५ नं. मिथुन

नक्षत्र- रोहिणी ०६|५०

मृग २९|५१

योग- वरीयान

करण- कौलव

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - पैशाशी निगडित समस्या आज विशेषत्वाने सुटतील. दिवसाचे सार्थक झाल्याचे वाटेल. अनेक अनिर्णित गोष्टी योग्य निर्णयाप्रत येतील.

वृषभ- जे ठरवाल ते आज करालच असा आजचा दिवस आहे. आपले आकर्षक व्यक्तिमत्व अजून उठावदार दिसेल. लोकांना आपल्याकडून अनेक चांगल्या गोष्टी आकर्षित करतील.

मिथून - प्रेमात जरा पाय घसरण्याचा दिवस आहे. प्रेमात अपयश मिळू शकते. मनस्थिती थोडी खराब राहील. अतिचांगुलपणा दरवेळी कामाला येत नाही हा या दिवसाचा संदेश लक्षात ठेवा.

कर्क -आयुष्यामध्ये आपण केलेल्या गोष्टींचा आज योग्य परतावा मिळताना दिसेल. नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींबरोबर हसत खेळत दिवस जाईल.

सिंह - राजकारणामध्ये यश आहे. मात्र चोरावर मोर होऊन राहावे लागेल. समाजकारण आपल्या हातचा मळ आहे आणि त्यात आपण पुढे जाल. कामांमध्ये यशस्वी होण्याचा आजचा दिवस आहे.

कन्या - लक्ष्मी विष्णू उपासना विशेष फलदायी ठरणार आहे. तीर्थक्षेत्री भेटीचे योग आहेत आणि मोठ्या प्रवासाचे योग दिसून येत आहेत.

तुळ - काळा पैसा, गुप्तधन, अचानक मिळणाऱ्या पैशाचा मागे आज लागू नका. अन्यथा अडचणीत येण्याचा संभव आहे. नशिबात आहे तितक्या गोष्टी नक्की मिळतील. पण त्यासाठी घाई नको.

वृश्चिक - भागीदाराबरोबर नवीन व्यवसायाचे प्रस्ताव समोर घेऊन बैठका होतील. व्यवसायाच्या नवीन सुसंधी आणि मार्ग तयार होतील. दिवस चांगला राहील.

धनु - विनाकारण आपले शत्रू आपल्याला त्रास देतील. काही वेळेला कातडी बचाव अशी भूमिका घ्यावी लागते. तो आजचा दिवस आहे. तब्येत जपावी.

मकर - अनेक गोष्टी आणि भावना समोरच्याला न सांगितल्यामुळे गैरसमज निर्माण होतील. खरंतर दिवस चांगली संधी घेऊन आलेला आहे. प्रेमाचे रंग बहरतील याचे स्वागत करा.

कुंभ - "नवे नवोती भवती" असा दिवस आहे. आयुष्यामध्ये अनेक नवीन संधी येतील. नव्याने काही गोष्टी घडतील. जागेशी निगडित कार्य पार पडेल.

मीन- छोट्या प्रवासाचा किंवा लहान सहलीला जाण्याचा आजचा दिवस आहे. शेजारी आणि भावंडांशी सुहृद संबंध राहतील. दिवस चांगला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Elections : मोठी बातमी! महाविकास आघाडीत ६ जागांवर वाद, 17 जागांचा तिढा; काँग्रेसच्या दिग्गज नेत्याची माहिती

Astro Tips : या आठवड्यात ६ राशींच्या लोकांची चांदीच चांदी; नोकरीच्या समस्या होतील दूर

Maharashtra News Live Updates: मुंबईतील ३ जागांचा तिढा आज मातोश्रीवर सुटणार

Aishwarya- Abhishek: ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाची चर्चा, तर प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत जोडलं नाव, अभिषेक बच्चनला नेटकऱ्यांनी घेरलं

Maharashtra Politics: शिरुरमध्ये उद्धव ठाकरेंना धक्का! बडा नेता अजित पवारांच्या गळाला; विधानसभेचे तिकीटही मिळणार?

SCROLL FOR NEXT