Gajkesari Rajyog  saam tv
राशिभविष्य

Gaj Kesari Rajyog: गुरु बनवणार शक्तीशाली गजकेसरी राजयोग; 'या' राशींचा बँक बॅलन्स प्रचंड वाढणार

Gaj Kesari Rajyog 2025: नवग्रहांमध्ये गुरू या ग्रहाला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरू हा सकारात्मकतेचा, शहाणपणाचा आणि समृद्धीचा अधिपती आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नवग्रहात देवांचा गुरू गुरू हा अत्यंत खास ग्रह मानला जातो. ज्योतिष्य शास्त्रानुसार, गुरु हा ज्ञान, बुद्धी, धर्म, कायदा, शिक्षण, संपत्ती आणि ऐश्वर्य इत्यादींचा कारक मानला जातो. त्यामुळे गुरूच्या स्थितीत झालेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या जीवनात होत असतो. सद्या गुरू मिथुन राशीत विराजमान आहे.

यावेळी गुरुची अशा एखाद्या ग्रहाशी युती होणार आहे ज्यामुळे गुरूची पहिली दृष्टी चंद्रावर आहे. त्यामुळे गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. अशा तऱ्हेने काही राशींना नोकरी आणि व्यवसायात बंपर लाभ मिळण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

धनु रास

गजकेसरी राजयोग या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. मनाच्या शांततेमुळे निर्णय घेण्याची क्षमता वाढणार आहे. यासोबतच नवीन नोकरी सुरू करायची असेल तर या काळात ती करणं फायद्याचं ठरू शकतं. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांनाही बरेच फायदे मिळू शकतात.

तूळ रास

गजकेसरी राजयोग देखील या राशीच्या लोकांसाठी आनंद घेऊन येऊ शकणार आहे. तुमची रखडलेली सर्व कामं पुन्हा एकदा सुरू होऊ शकतात. यावेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमचा अध्यात्माकडे कल राहणार आहे. अशा वेळी धार्मिक कार्याचा भरपूर अनुभव येऊ शकतो.

कुंभ रास

या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. उत्पन्नातही प्रचंड वाढ होऊ शकणार आहे. यासोबतच चांगली नोकरी मिळण्यासोबतच पद आणि पगारातही वाढ होऊ शकते. उत्तर संस्कारांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! या ३ कारणांमुळे पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता रखडला, तुम्हीही ती चूक केलीय का?

५०० कोटींचा घोटाळा, ६० कोटी खात्यात वळवले; बड्या IAS अधिकाऱ्याला CBI कडून अटक, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: नालेसफाई करणाऱ्या ठेकेदाराकडून लहान मुलांच्या जीवाशी खेळ

पाण्यात फेकला तरी खराब होत नाही! पाण्यामध्ये वॉटरप्रूफ फोन कसं काम करतो?

Raigad Crime: रायगड हादरले! महिलेची आत्महत्या, कुंडलिका नदीत मारली उडी

SCROLL FOR NEXT