Guru Vakri saam tv
राशिभविष्य

Guru Vakri: गुरु मिथुन राशीच चालणार उलटी चाल; करियर-व्यापारात लाभाची संधी

Jupiter Vakri In Mithun 2025: वैदिक कॅलेंडरनुसार, गुरु ग्रह वक्री होणार आहे. गुरु ग्रहाच्या वक्री स्थितीचा काही राशींवर चांगला परिणाम होणार आहे. यावेळी कोणत्या राशींवर याचा चांगला परिणाम होणार आहे ते पाहूयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्त्व असतं. यामध्ये गुरु हा ज्ञान, मुलं, शिक्षण, धार्मिक कार्य, पवित्र स्थाने, या सर्वांचा कारक मानला जातो. ज्यावेळी गुरुच्या हालचालीत बदल होतो तेव्हा या सर्व क्षेत्रांवर त्याचा परिणाम होत असतो.

वर्षाच्या अखेरीस गुरु मिथुन राशीत वक्री होणार आहे. यामुळे मिथुन राशीवर बुध ग्रहाचं राज्य असणार आहे. गुरु ग्रहाचा वक्री होण्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. या राशींच्या लोकांसाठी संपत्तीत वाढ आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींना हे लाभ मिळणार आहेत ते पाहूयात.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाचे वक्रदृष्टी सकारात्मक ठरू शकणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार आहात. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकणार आहे.

सिंह रास

गुरु ग्रहाची वक्रदृष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तुम्हाला तुमच्या कमाईतून चांगला नफा मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान आणि मतमोजणी कधी? जाणून घ्या

Bridal Beauty Kit: लग्नानंतर नव्या नवरीच्या बॅगेत असायलाच हव्यात 'या' ७ गोष्टी, कधीही ठरतील फायदेशीर

Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

Property Rights: नातवाला नाही मिळणार आजोबांची जमीन, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT