Gudi Padwa zodiac royal life saam tv
राशिभविष्य

Gudi Padwa 2025: गुढीपाडव्याच्या दिवसापासून 'या' राशी जगणार राजासारखं आयुष्य; सूर्य, चंद्र, शुक्र, बुध बनवणार दुर्मिळ योग

Gudi Padwa zodiac royal life: गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी, हिंदू नववर्षाची सुरुवात होणार आहे, आणि त्याचवेळी सूर्य आणि चंद्र मीन राशीत एकत्र येणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत शुक्र आणि बुध देखील असणार आहेत. तब्बल 100 वर्षांनंतर मीन राशीत असा अद्भुत ग्रहसंयोग होत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

30 मार्च हा दिवस ज्योतिष्य शास्त्र आणि हिंदू धर्माच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, कारण या तिथीपासून हिंदू नववर्ष सुरू होणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदा केवळ नवीन हिंदू वर्षाची सुरुवात नव्हे तर चैत्र नवरात्रीची सुरुवात देखील होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 30 मार्च रोजी अनेक दुर्मिळ पण शुभ योग तयार होतोय. या योगाचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होणार आहे. ज्याचा सर्व राशींवर व्यापक आणि सखोल प्रभाव पडणार आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी कोणते योग येणार जुळून?

ज्या दिवशी नवीन हिंदू वर्ष सुरू होणार आहे त्या दिवशी ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य आणि चंद्र मीन राशीत एकत्र विराजमान होणार आहे. इतकंच नाही तर त्यांच्यासोबत शुक्र आणि बुधही असणार आहेत. दरम्यान 100 वर्षांनंतर या दिवशी मीन राशीत ग्रहांची युती होणार आहे. या 4 शुभ ग्रहांच्या संयोगाने अनेक राजयोग तयार होणार आहेत.

३० मार्च म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी कलात्मक राजयोग, बुधादित्य राजयोग, शुक्रादित्य, मालव्य राजयोग असे शक्तिशाली राजयोग निर्माण होणार आहेत. याचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. मात्र यामध्ये काही अशा राशी आहेत, ज्यांच्यावर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी रवि, चंद्र, शुक्र आणि बुध यांची विशेष युती विशेष लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढल होणार आहे. ज्यामुळे तुम्ही धाडसी निर्णय घेऊ शकणार आहात. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकणार आहे. मुलांकडून चांगली बातमी कानी येणार आहे.

मिथुन रास

या ग्रहांची युती आणि योगामुळे मिथुन राशीच्या लोकांना करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे. तुमची अचानक आर्थिक स्थिती मजबूत होणार असल्याची चिन्ह आहेत.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक लाभाचे संकेत देत आहे. आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे आपण नवीन संधींचा लाभ घेऊ शकाल. दीर्घकाळापासून चे कौटुंबिक प्रश्न सुटतील आणि शिक्षक व वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन भागीदारी फायदेशीर ठरणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Student Death : अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, अज्ञातांनी छातीत गोळ्या घालून संपवलं

Maharashtra Live News Update : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा संगीत सूर्य केशवराव भोसले पुरस्काराने सन्मान

आदिवासींकडून पोलीस ठाण्यावर दगडफेक, अनेक पत्रकार, पोलीस जखमी; नेमकं काय घडलं? VIDEO

IND vs AUS: विराट-रोहितचा युग संपला, २०२७ चा वर्ल्डकप खेळणार नाही? कुणी दिले संकेत

Chhagan Bhujbal: ओबीसी नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर मंत्री छगन भुजबळ आक्रमक|VIDEO

SCROLL FOR NEXT