Gudi Padwa 2026 Date google
राशिभविष्य

Gudi Padwa 2026: गुढीपाडव्यापासून सुरू होतंय विक्रम संवत 2083; तुमच्या राशीवर काय परिणाम होणार?

गुढीपाडवा 2026 निमित्त विक्रम संवत 2083 ची सुरुवात होत असून, गुरु आणि मंगळ ग्रहांच्या प्रभावामुळे 12 राशींवर काय परिणाम होणार आहे, जाणून घ्या सविस्तर राशीभविष्य.

Surabhi Jayashree Jagdish

हिंदू नववर्षाची सुरुवात दर्शवणारा गुढीपाडव्याचा सण यंदा 18 मार्च रोजी साजरा होतोय. या दिवसाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. वैदिक पंचांगानुसार, याच दिवशी विक्रम संवत 2083 ची सुरुवात होत असून, नवीन वर्ष अनेक राशींसाठी महत्त्वाचं बदल घेऊन येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षावर गुरु ग्रहाचं अधिपत्य असेल. तर मंगळ ग्रह मंत्री म्हणून प्रभाव टाकणार आहे. त्यामुळे मेष ते मीन या सर्व राशींवर याचा वेगवेगळा परिणाम दिसू शकतो.

विक्रम संवत 2083 म्हणजे काय?

विक्रम संवत ही भारतातील प्राचीन काळापासून वापरली जाणारी पारंपरिक दिनदर्शिका आहे. धार्मिक विधी, सण-उत्सव आणि शुभमुहूर्त निश्चित करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. असं मानलं जातं की, याची सुरुवात सम्राट विक्रमादित्य यांच्या काळात झाली, म्हणूनच या कालगणनेला त्यांचं नाव देण्यात आलंय.

12 राशींवर संभाव्य प्रभाव

ज्योतिषशास्त्रीय मते, यंदाचे वर्ष काही राशींसाठी विशेष लाभदायक ठरू शकणार आहे. मेष, वृश्चिक, धनु आणि मीन राशींच्या व्यक्तींना करिअर आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळू शकते. समाजातील प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता असून आर्थिक स्थितीही मजबूत राहू शकते.

  • मिथुन आणि कन्या राशींसाठी हे वर्ष मध्यम स्वरूपाचं राहण्याची शक्यता आहे. यश मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. तसंच आरोग्याची काळजी घेणं आणि अनावश्यक खर्च टाळणं आवश्यक ठरेल.

  • वृषभ आणि तूळ राशींना साधारण परिणाम अनुभवायला मिळू शकतात. अध्यात्मिक विचारांकडे ओढ वाढू शकते आणि धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळू शकते. संयमाने काम केल्यास यश मिळण्याची शक्यता आहे.

  • कर्क आणि सिंह राशींसाठी हे वर्ष थोडं आव्हानात्मक ठरू शकतं. विशेषतः केतूच्या प्रभावामुळे काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणं गरजेचं आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधीच इंधन तुटवडा त्यात दरवाढीचा भडका; सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार? VIDEO

आर्थिक समस्या सुटणार, खिशात पैसा टिकणार; ५ राशींच्या लोकांवर महालक्ष्मी प्रसन्न होणार

राज्यातील कारागृह सुरक्षा व्यवस्थेची ऐशीतैशी; अधिकारी-कैद्यांची एकत्र दारू पार्टी

Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात मृत्यूचं तांडव! स्कॉर्पिओ दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

Fact Check: एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस? ट्रकमधून नोटा पडतानाचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT