Grah Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Grah Gochar 2025: चंद्र सिंह राशीत संक्रमण करणार आहेत. येथे मंगळ आणि केतू ग्रह आधीच उपस्थित आहेत. मंगळ, केतू आणि चंद्र सिंह राशीत आल्याने तीन राशींना फायदा होण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

मंगळ ग्रह ७ जून २०२५ पासून सिंह राशीत आहे.

केतू आधीच १८ मे २०२५ रोजी सिंह राशीत प्रवेश केलाय.

सिंह, धनु, मकर, आणि वृश्चिक राशींना विशेष लाभ मिळू शकतो.

मंगळ, केतू, आणि चंद्र हे तिन्ही ग्रहांचे ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. मंगळला ग्रहाचा सेनापती म्हटलं जातं. तर केतूला सावली ग्रह म्हटलं जातं. दुसरीकडे चंद्रदेव व्यक्तीची मानसिक स्थिती, मन, विचार, स्वभाव आणि वाणी यांचे नेतृत्व करतात. या तिन्ही ग्रहांची कृपा कोणत्या राशीवर होते, तर त्यांना त्यांच्या जीवनात यश मिळते.

वैदिक पंचागानुसार वर्ष २०२५ मध्ये ७ जून ते २८ जुलैपर्यंत मंगळ ग्रह सिंह राशीत राहणार आहे. तर मंगळ ग्रहाचे गोचर होण्याआधी १८ मेला केतू ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला होता. आता केतू ५ डिसेंबर २०२६ पर्यंत सिंह राशीत राहणार आहे. सिंह राशीत हे दोन्ही ग्रह असतानाच २६ जुलैला दुपारी ३ वाजून ५१ मिनिटांनी चंद्र देवाने सिंह राशीत प्रवेश केलाय. चंद्र देव २८ जुलै २०२५ च्या रात्री ११ वाजेपर्यंत सिंह राशीत राहणार आहे. त्यामुळे या तिन्ही ग्रहाच्या भेटीमुळे तीन राशींचे नशीब पलटणार आहे.

मेष राशी

मंगळ, केतू आणि चंद्र देवाच्या आशीर्वादाने मेष राशीच्या लोकांच्या नात्यांमधील गैरसमज दूर होतील. घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील. व्यावसायिकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील कोणताही सदस्य आजारी असल्यास त्याचे/तिचे आरोग्य सुधारेल. त्वरीत घेतलेले निर्णय अनेकांना आर्थिक लाभ मिळवून देणारे ठरतील.

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांवरही चंद्र, मंगळ आणि केतू ग्रहाचा आशीर्वाद मिळणार आहे. कौटुंबिक तणाव कमी झाल्यामुळे घरात आनंद वाढेल. ज्यांची तब्येत खराब होती त्यांचे आरोग्य चांगले राहील. तर आर्थिक स्थिती मजबूत होईल. त्यामुळे अनेकजण कर्जातून मुक्त होतील. याशिवाय तरुणांचे मानसिक आरोग्य चांगले राहील.

उपाय- ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी, गरिबांना आर्थिक मदत करा. रविवारी ७ मुलींना जेवण द्या.

शुभ दिवस- शुक्रवार

सिंह

मंगळ, केतू आणि चंद्राची युती सिंह राशीच्या लोकांसाठी खूप चांगली राहील. आत्मविश्वास वाढल्याने व्यक्तिमत्त्व सुधारेल. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्या नात्यात सुधारण होईल, शिवाय त्यांचे नाते घट्ट होईल. अनावश्यक खर्च कमी झाल्यामुळे तरुणांची बचत वाढेल. नोकरी करणाऱ्या किंवा स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल.

उपाय- पाणी दान करा आणि लहान मुलींना खाऊ घाला.

शुभ दिवस- मंगळवार

टीप : येथे देण्यात आलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. साम टीव्ही याची पुष्टी करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत भाजपला कडू का नकोत? प्रहारच्या विलिनीकरणाला भाजपचा विरोध?

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव पिकअप उलटला; २ मुलांसह १२ जणांचा मृत्यू

Bengaluru Rain: बेंगळूरमध्ये पावसाचा हाहाकार; हॉस्पिटलजवळ भिंत कोसळली, ७ जणांचा मृत्यू

Nanded: पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; विजेचा धक्का लागून २ तरुणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, पडद्यामागं जोरदार हालचाली

SCROLL FOR NEXT