Budh Gochar 2024 Google
राशिभविष्य

Budh Gochar: आजपासून 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम; बुध करणार शुक्राच्या तूळ राशी एन्ट्री

Budh Tula Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, बुध (Mercury) हा ग्रह बुद्धिमत्ता, व्यवसाय, वाणिज्य आणि संवादाचा कारक मानला जातो. आज बुध ग्रह आपल्या गतीमध्ये बदल करत, सौंदर्य आणि शुक्र (Venus) ग्रहाची मालकी असलेल्या तूळ राशीत (Libra) प्रवेश करत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार मानण्यात येते. व्यापार, तर्कशक्ती, बुद्धिमत्ता आणि संवाद यांचं प्रमुख कारक म्हणून बुधाची विशेष ओळख आहे. बुध वेळोवेळी आपली रास बदलत राहतो आणि मेष ते मीन या सर्व राशींवर आपला प्रभाव टाकतो.

या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी बुध आपल्या स्वराशी कन्या राशीतून बाहेर पडून शुक्राच्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तो २३ ऑक्टोबरपर्यंत याच राशीत भ्रमण करणार आहे. शुक्र हा तूळ राशीचा स्वामी आहे. त्यामुळे बुध आणि शुक्र यांच्या या संयोगाचा काही राशींवर विशेष शुभ परिणाम दिसून येईल. यावेळी कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे ते पाहूयात

कर्क रास

कर्क राशीच्या जातकांसाठी बुधाचा तूळ गोचर अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या काळात आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. जे पैसे अडकलेले होते ते परत मिळण्याची शक्यता आहे. महत्वाच्या कामांमध्ये यश मिळू शकणार आहे. घरात शांतता आणि समाधानाचं वातावरण राहणार आहे.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या काळात धनलाभाचे अनेक योग निर्माण होतील. नवीन उत्पन्नाचे मार्ग खुले होणार आहे. या काळात जुने आर्थिक स्रोतही एक्टिव्ह होणार आहेत. व्यवसायिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. आर्थिक बाबतीत बळकटी मिळणार आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या जातकांना या काळात भाग्याची साथ मिळणार आहे. जी कामं आतापर्यंत अडकलेली होती ती पूर्ण होणार आहे. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल आणि व्यवसायिक स्थिती अधिक मजबूत होणार आहे. प्रवासाचं नियोजन केल्यास ते यशस्वी आणि फलदायी ठरणार आहे. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये अवकाळी पावसामुळे गहू पिकाला फटका

Dal Makhani recipe: रेस्टॉरंट स्टाईल दाल मखनी घरच्या घरी कशी बनवाल, लिहून घ्या रेसिपी

Solapur: माहेरी गेलेल्या बायकोचा परत येण्यास नकार, व्हिडीओ बनवून तरुणाने आयुष्य संपवलं; सोलापुरमध्ये खळबळ

Historical Places : पर्वतरांगांच्या सान्निध्यात अन् नद्यांच्या संगमावर वसलाय 'हा' किल्ला, इतिहासातील अनोखा जलदुर्ग

उत्तर प्रदेशहून पहाटे ट्रेन मुंबईत पोहचली, ४ वाजता पोलिसांनी जनरल डब्ब्यात धाड टाकली, बॅग पाहून सगळेच चक्रावले

SCROLL FOR NEXT