Diwali 2024 saam tv
राशिभविष्य

Diwali 2024: पुढच्या दिवाळीपर्यंत देवी लक्ष्मी 'या' राशींवर बरसवणार पैसा; फक्त करा हा उपाय

Diwali 2024: यंदा दिवाळी ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर या दोन्ही दिवशी आहे. या काळात दिवाळीवर काही विशेष उपाय केल्यास त्याचा प्रभाव पुढील वर्षीच्या दिवाळीपर्यंत राहणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

दिवाळीला सुरुवात झाली असून संपूर्ण देशभरात अगदी उत्साहात हा सण साजरा केला जातोय. दिवाळी, संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्याचा सण यावर्षी 31 ऑक्टोबर 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. यंदा दिवाळी ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर या दोन्ही दिवशी आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यंदाची दिवाळी ही ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने देखील महत्त्वाची आहे. या काळात दिवाळीवर काही विशेष उपाय केल्यास त्याचा प्रभाव पुढील वर्षीच्या दिवाळीपर्यंत राहणार आहे. तज्ज्ञांच्या मते हे उपाय काही राशीच्या लोकांसाठी विशेषतः फायदेशीर असणार आहे. जाणून घेऊया हे उपाय आणि राशी कोणत्या आहेत.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची नेहमी विशेष कृपा असणार आहे. आर्थिक लाभाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी चांगला राहणार आहे. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होणार आहेत. कुटुंबात सुख-शांती नांदणार आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांना या काळात लक्ष्मीच्या आशीर्वादाने भरपूर आर्थिक लाभ मिळू शकणार आहेत. नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्ही तसे करू शकता. कर्जमुक्ती मिळाल्याने तणाव कमी होऊ शकणार आहेत. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकणार आहे.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ राहणार आहे. नोकरीत बढतीमुळे आर्थिक लाभ होईल. नफा मिळवून आणि पैशांची बचत करून कर्जापासून मुक्ती मिळू शकणार आहे. कौटुंबिक जीवनात प्रेम आणि आनंद वाढणार आहे. परदेशात नोकरी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.

काय कराल उपाय?

हिंदू धर्मात, देवी लक्ष्मीचा निवास गोमती चक्रात मानला जातो, ज्यामुळे धन आणि समृद्धी येते. लक्ष्मीपूजनात लवंग आणि वेलचीचा वापर शुभ आहे. या राशींसाठी फक्त 5 गोमती चक्र, 5 गुढ्या, 5-5 लवंगा आणि वेलची एका लाल चौकोनी कपड्यात बांधून दिवाळी पूजेदरम्यान देवी लक्ष्मीला अर्पण करायाचंय.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न; घरी बोलावून शेतकऱ्याचं सोडवलं उपोषण

Thackeray vs Shinde: शिंदे 'नरकासूर'; नरक चतुर्दशीवरून उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर विखारी टीका

नवी मुंबईत पालिका निवडणुकीआधी शरद पवार गटात नाराजी उफाळली; आधी बंडखोरी, आता आमलेंना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Bacchu Kadu: आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा; बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य

SCROLL FOR NEXT