GajLakshmi Rajyog 2025 saam tv
राशिभविष्य

Gajlakshmi Rajyog: मिथुन राशीत १२ वर्षांनंतर बनणार गजलक्ष्मी राजयोग; 'या' राशींनी गुरु-शुक्राच्या मदतीने मिळणार अमाप पैसा

Gajlakshmi Rajyog: गुरुला एक रास बदलण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागतो. पुढच्या वर्षी गुरु-शुक्र या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे मिथुन राशीत गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार,प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. यामध्ये गुरु म्हणजेच बृहस्पतिला सर्वात शुभ ग्रह मानलं जातं. गुरुला एक रास बदलण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागतो. सध्या तो शुक्र वृषभ राशीत असून तो पुढच्या वर्षी तो राशी बदलणार आहे. यावेळी वृषभ राशीतून बाहेर पडून मिथुन राशीत प्रवेश करतील.

शुक्र देखील जुलै 2025 मध्ये मिथुन राशीत गोचर करणार आहे. यामुळे या ठिकाणी दोन्ही शुभ ग्रह एकत्र असल्यामुळे 12 वर्षांनंतर मिथुन राशीमध्ये गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. या ग्रहांच्या गोचरमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागणार आहे ते पाहूयात.

कधी होणार गुरु-शुक्राची युती?

पंचागानुसार, गुरू पुढील वर्षी 14 मे 2025 च्या रात्री मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. 2 महिन्यांनंतर शुक्र देखील 26 जुलै रोजी सकाळी 9 वाजता मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. 21 ऑगस्ट 2025 पर्यंत ते मिथुन राशीत राहणार आहे. या काळात दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे मिथुन राशीत गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे.

तूळ रास

गजलक्ष्मी राजयोगाच्या निर्मितीमुळे तूळ राशीच्या लोकांना विविध क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रगतीच्या अनेक शक्यता आहे. यावेळी तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला अचानक मोठा नफा मिळू शकणार आहे.

सिंह रास

पुढील वर्षी होणारी गुरु आणि शुक्राची युती या राशीच्या लोकांसाठी खूप अनुकूल ठरणार आहे. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही आखलेले धोरण यशस्वी होऊ शकतं. तुमची प्रलंबित कामंही पुढील वर्षी पूर्ण होऊ शकतात.

मिथुन रास

या राशीच्या लोकांच्या जीवनात गजलक्ष्मी राजयोग तयार झाल्याने उत्पन्नाचे अनेक स्त्रोत उघडू शकणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना चांगली बातमी मिळू शकणार आहे. कुटुंबातील व्यक्ती तुम्ही प्रत्येक पावलावर साथ देणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT