Gajkesari Yog on Akshaya Tritiya 2026 may bring wealth and success for select zodiac signs. saam tv
राशिभविष्य

Akshaya Tritya: तीन राशींसाठी अक्षय तृतीया असेल खास; करिअरमधील प्रगतीसह संपत्तीत होईल वाढ

Gajkesari Yog On Akshaya Tritya: यावर्षी अक्षय तृतीयेचा सण १९ एप्रिल २०२६ रोजी साजरा होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी शुभ गजकेसरी योग तयार होत आहे. तीन राशींना या सणापासून मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्यांचे नशीब पालटणार आहे.

Bharat Jadhav

  • चंद्र आणि गुरू मध्यवर्ती स्थितीत असताना गजकेसरी योग तयार होतो.

  • हा योग कोणत्या राशींसाठी शुभ ठरेल

  • जीवनात धन, समृद्धी आणि प्रगती येणार आहे.

यावर्षाची अक्षय तृतीया खूप विशेष असणार आहे, कारण या दिवशी चंद्र आणि गुरूच्या विशेष स्थितीमुळे गजकेसरी योग तयार होतोय. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग तीन राशींच्या जातकांसाठी फलदायी असेन. त्यांच्या जीवनात धन, समृद्धी आणि प्रगती येणार आहे. या राशीच्या जातकांच्या करिअरमध्ये लक्षणीय प्रगती होऊ शकते. तसेच भरघोस पैसा देखील त्यांना मिळण्याची शक्यता आहे. चंद्र आणि गुरू मध्यवर्ती स्थितीत असताना गजकेसरी योग तयार होतो. हा योग कोणत्या राशींसाठी शुभ ठरेल, ते पाहूया.

मेष

ही अक्षय तृतीया मेष राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. त्यांच्या करिअरमध्ये लक्षणीय प्रगती होईल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. हे लोक जे काही काम हाती घेतील, त्यात यश मिळवतील. या जातकांना नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. ज्यांना स्वत: चं काही करायचं असेन तर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता.

तूळ

तूळ राशीच्या लोकांना तर थेट देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. अक्षय तृतीयापासून या लोकांच्या आयुष्यात शुभ दिवस येण्यास सुरुवात होईल. त्यांना धन आणि समृद्धीची कमतरता भासणार नाही. ज्यांचा व्यवसाय आहे,त्यांना चांगला नफाही मिळेल. नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचारही करू शकता. भरघोस उत्पन्नासाठी शुभ संधी निर्माण होत आहेत.

धनु

धनु राशीच्या व्यावसायिकांसाठी हा काळ खूप शुभ ठरेल. त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. त्यांना त्यांच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवण्यात यश येईल. तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळू शकते. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही परदेशाचा प्रवास करू शकता. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. घर किंवा वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न साकार होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आपच्या खासदारानंतर आता 'या' राज्यातील अख्खा पक्षच भाजपमध्ये विलीन होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Weight Loss Foods: डाएटमध्येही खाऊ शकता हे ७ स्ट्रीट फूड, वजनावर काहीच होणार नाही परिणाम

पुण्यात गुंडगिरीचं साम्राज्य, पोलीस झोपलेले, वसुलीच्या नावाखाली एजंटची गुंडगिरी

Crime: नगरपरिषदेत रक्तरंजित थरार! सभापती अन् कार्यकारी अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या; डोक्यात गोळी घुसल्याने एकाचा मृत्यू

चहा पावडरमुळे किडनी फेल? केमिकलयुक्त चहा पावडर बाजारात?

SCROLL FOR NEXT