trigrahi rajyog pisces saam tv
राशिभविष्य

Mahalaxmi Rajyog 2025: आजपासून 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; मंगळ-चंद्र मिळवून बनवणार महालक्ष्मी राजयोग

Mahalaxmi Rajyog In Kundli: मंगळ (Mars) आणि चंद्र (Moon) यांचा शुभ संयोग झाल्यामुळे एक अत्यंत शक्तिशाली असा महालक्ष्मी राजयोग (Mahalaxmi Rajyog) तयार होत आहे. या योगामुळे काही राशींचे नशीब आजपासूनच (From today) बदलेल आणि त्यांच्यावर धन-संपत्तीची वर्षाव होईल.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार ग्रहांच्या स्थिती बदलामुळे वेळोवेळी अनेक शुभ योग आणि राजयोग तयार होत असतात. याचा प्रभाव पृथ्वीवरील घटनांवरही दिसून येतो. येत्या 24 सप्टेंबर रोजी मनाचा कारक मानला जाणारा चंद्र ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे. याच राशीत यापूर्वीपासूनच ग्रहांचा सेनापती मंगळ विराजमान आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, मंगळ आणि चंद्र यांच्या युतीने महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. या विशेष योगामुळे काही राशींचं भाग्य खुलणार आहे. त्याचप्रमाणे संपत्ती आणि समृद्धी मिळण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या भाग्यवान राशींना याचा लाभ होणार आहे ते पाहूयात.

कन्या रास

कन्या राशीसाठी महालक्ष्मी राजयोग अत्यंत शुभ ठरणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी आकस्मिक धनलाभ होऊ शकणार आहे. बराच काळ अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळण्याची संधी आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग अत्यंत फायदेशीर ठरू शकणार आहे. कारण महालक्ष्मी राजयोग तुमच्या राशीपासून संपत्ती आणि भौतिक सुखाच्या स्थानी तयार होणार आहे. या काळात सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते. विरोधक शांत राहतील त्यामुळे व्यापाऱ्यांना मानसिक शांती लाभणार आहे. तरुणांना आपल्या ध्येयाच्या दिशेने यश मिळवणं सोपं जाऊ शकतं. सासरच्या मंडळींसोबत संबंध अधिक घट्ट होतील.

कुंभ रास

कुंभ राशीसाठी महालक्ष्मी राजयोग सकारात्मक फलदायी ठरणार आहे. कारण हा योग तुमच्या राशीपासून नवव्या स्थानी तयार होतोय. या काळात तुम्हाला भाग्याचा जबरदस्त पाठिंबा मिळू शकतो. धार्मिक किंवा मंगलमय कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा आणि स्पर्धांमध्ये चांगले निकाल मिळतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संघटीत गुन्हा निष्पन्न, बागूल टोळीवर मोक्का लावण्याच्या हालचाली सुरू

Sonakshi Sinha: सर्वात जास्त काळ प्रेग्नेंसीचा वर्ल्ड रेकॉर्ड...; सोनाक्षी सिन्हाने प्रेग्नेंसीच्या अफवांवर दिली खास प्रतिक्रिया

Sperm quality decline: कोरोनानंतर पुरुषांच्या आरोग्यावर मोठा परिणाम; शुक्राणूंची गुणवत्ता घसरतेय, पुढील पिढीसाठी वाढतो धोका

Breast Cancer Awareness : स्तनाचा कर्करोग बरा होणं झालं शक्य, ऑन्कोसर्जननी रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे महिलेला जीवनदान

Pik Vima Yojana: शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! या तारखेपर्यंत फळपीक विमा योजनेसाठी करु शकता अर्ज; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT