Jupiter Transit 2024 Saam Tv
राशिभविष्य

Jupiter Retrograde 2025: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींची होणार बल्ले-बल्ले; गुरु वक्री होऊन देणार पैसा

Jupiter Retrograde November 11 money gain: ज्योतिषशास्त्रानुसार, देवगुरू बृहस्पती हा सर्वात मोठा आणि शुभ ग्रह मानला जातो. हा ग्रह ११ नोव्हेंबर २०२५ पासून वक्री चाल चालणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, देवगुरु बृहस्पती यांना नवग्रहांमध्ये विशेष स्थान देण्यात आलेलं आहे. त्यांच्या स्थितीत होणाऱ्या बदलांचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होत असतो. सध्या गुरु मिथुन राशीतून अतिचारी गतीने भ्रमण करत असून त्यांनी कर्क राशीत प्रवेश केला आहे. डिसेंबरपर्यंत ते याच राशीत राहणार आहेत.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, 11 नोव्हेंबर रोजी गुरु बृहस्पती कर्क राशीत वक्री होणार आहेत. वक्री स्थितीत ते त्यांच्या उच्च राशीत असणार आहेत. या उलट चालीनंतर तीन राशींसाठी हे काळ विशेष लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

कर्क रास

कर्क राशीच्या जातकांसाठी गुरु बृहस्पती लग्न भावात वक्री राहणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. निर्णयक्षमता वाढणार असून तुम्ही तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेता येतील. अध्यात्माकडे तुमचा कल वाढणार आहे. दान-पुण्याच्या कार्यात वाढ होईल.

वृषभ रास

गुरूचं वक्री होणं या राशींसाठी लाभदायक असणार आहे. यावेळी अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मानात वाढ होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले साथीदार मिळण्याची शक्यता आहे. परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. नोकरीपेशा व्यक्तींना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी गुरु बृहस्पती नवम भावात वक्री राहणार आहेत. यश आणि प्रतिष्ठेत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या जीवनातील अडचणी दूर होणार आहेत. भावंडांचा पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे उद्दिष्ट साध्य करता येणार आहे. संतानकडून आनंददायक बातमी मिळू शकते आणि पैतृक मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आजीसोबत झोपलेल्या ४ वर्षीय चिमुकलीचे अपहरण; बलात्कार करून रक्ताच्या थारोळ्यात सोडलं, भाजपचा ममता सरकारवर हल्लाबोल

Shocking News : कर्ज न फेडल्यामुळे एजंटने मर्यादा ओलांडल्या, कर्जदाराच्या पत्नीचे 'तसले' फोटो केले व्हायरल

Indurikar Maharaj Net Worth: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांची संपत्ती किती? जाणून घ्या

जगप्रसिद्ध ‘द ग्रेट ब्रिटिश बेकिंग शो'च्या एडिटरचे निधन; वयाच्या ५१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजन विश्वावर शोककळा

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

SCROLL FOR NEXT