Surya Gochar 2024 saam tv
राशिभविष्य

Surya Gochar 2024: १५ डिसेंबरपासून 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार, सूर्याच्या गोचरमुळे मिळणार पैसाच पैसा

Surya Gochar 2024: ज्या व्यक्तीवर ग्रहांचा राजा सूर्य दया दाखवतो त्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय आणि मान-सन्मान या सर्व गोष्टी मिळतात. डिसेंबर महिन्यात सूर्य गोचर करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये येत्या महिन्यात सूर्य देव गोचर करणार आहेत. ज्या व्यक्तीवर ग्रहांचा राजा सूर्य दया दाखवतो त्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय आणि मान-सन्मान या सर्व गोष्टी मिळतात.

कधी करणार सूर्य गोचर?

पुढच्या महिन्यात म्हणजेच रविवारी १५ डिसेंबर रोजी रात्री १०:१९ वाजता ग्रहांचा राजा सूर्य त्यांची राशी बदलणार आहे. वृश्चिक राशीतून बाहेर पडल्यानंतर सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींवर याचा परिणाम होणार आहे. कोणत्या राशींना यावेळी लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

मेष रास

सूर्याच्या धनु राशीत प्रवेश मेष राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळणार आहेत. या काळात तुम्हाला प्रलंबित पैसे मिळणार आहेत. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहणार आहे. येत्या काळात चांगले दिवस सुरू होणार आहेत.

तूळ रास

तूळ राशीसाठी सूर्याचे भ्रमण तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. सामाजिक कार्यात प्रगती आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकणार आहे. कुटुंबामधून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी बोनस मिळू शकतो.

धनु रास

धनु राशीच्या लोकांना त्यांच्या मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. या काळात तुमची पदोन्नती आणि उत्पन्न वाढणार आहे. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवू शकणार आहात. सूर्याच्या आशीर्वादाने नोकरीत यश आणि व्यवसायात प्रगती होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बांगड्यांचा ढिग अन् नेकलेस; ZP सदस्याकडे पोलिसांना सापडलं 4 कोटी रुपये किंमतीचे ३ किलो सोन्याचे दागिने

Shocking: महिला नेत्याचा संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह, बॉयफ्रेंडवर हत्येचा आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये कोयता हातात घेऊन दहशत, दोन आरोपींची पोलिसांकडून धिंड

High Court: शपथ घेताना देवी-देवता, भारत माता, गुरूंचे नाव घेतले; भाजपच्या २० नगरसेवकांची शपथ हायकोर्टाकडून रद्द

Maharashtra Politics: शिवसेनेत गेलेले 6 बंडखोर खासदार अपात्र होणार? ठाकरेंनी टाकला मोठा डाव

SCROLL FOR NEXT