Lucky Zodiac Signs in 2025 saam tv
राशिभविष्य

August 2025 Planets Transits: ऑगस्टमधील ग्रहांच्या गोचरमुळे 'या' राशी जगणार राजासारखं आयुष्य; आपोआप मिळणार पैसा

Lucky Zodiac Signs in 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यामध्ये ग्रहांचे गोचर (राशी परिवर्तन) होत असते, ज्यामुळे सर्व १२ राशींवर त्याचा शुभ-अशुभ प्रभाव दिसून येतो. ऑगस्ट २०२५ महिन्यामध्ये काही मोठे ग्रह आपल्या राशी बदलणार आहेत, ज्यामुळे एक शक्तिशाली राजयोग तयार होईल.

Surabhi Jayashree Jagdish

प्रत्येक महिन्याला कोणते ना कोणते ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा संपत आला आहे आणि पुढचे सुमारे 25 दिवस ज्या पद्धतीने ग्रह-गोचर होणार आहेत, त्यामुळे हा महिना खूप खास ठरणार आहे. 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी बुध ग्रह उदय होतील, त्यानंतर ते मार्गी होतील.

शिवाय या महिन्यात 17 ऑगस्टला सूर्य गोचर करणार आहे तर 21 ऑगस्टला शुक्र गोचर करणार आहे. याशिवाय काही ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीतही बदल होणार आहेत. या संपूर्ण काळात काही राशींसाठी विशेष शुभ योग तयार होत आहेत.

मेष रास

ऑगस्टच्या पुढील 25 दिवसांत मेष राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येणार आहेत. याशिवाय व्यवसाय उत्तम चालणार आहे. धार्मिक प्रवासाची शक्यता आहे. अडलेली कामं पूर्ण होणार असून त्यामध्ये तु्म्हाला यश मिळणार आहे

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना फायदेशीर ठरणार आहे. कामामध्ये सकारात्मक बदल दिसून येण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल आणि समाजात मान-सन्मान मिळणार आहे. घरात सुख-सुविधा वाढणार आहेत.

मकर राशी

शनीच्या साडेसातीचा प्रभाव मकर राशीवरून संपलेला आहे. त्यामुळे आता त्यांच्या जीवनात यश, संपत्ती आणि स्थैर्य येण्याची शक्यता आहे. विवाहाचे योग निर्माण होतील. मालमत्ता खरेदीसाठीही योग्य काळ आहे.

कुंभ राशी

कुंभ राशीसाठी येणारे दिवस खूप सकारात्मक आहेत. या काळात तुम्हाला मनासारखं यश मिळणार आहे. करिअरमध्ये मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. बँक बॅलन्स वाढेल. समाजात प्रतिष्ठा आणि सन्मान मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Heavy Rain : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस; शेताला आले तलावाचे स्वरूप, घरातही शिरले पाणी

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Box Office: शनिवारी 'महावतार नरसिंह'ने मारली बाजी; 'सैयारा', 'सन ऑफ सरदार २'ने केली कमाई

Mumbai: खबरदार! कबुतरांना दाणे टाकाल तर भरावा लागेल ५०० रुपयांचा दंड, मुंबई महानगर पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना जुलैचे १५०० आले नाहीत? ही ७ कारणे असू शकतात

SCROLL FOR NEXT