Laxmi devi saam tv
राशिभविष्य

Sunday Upay: लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी रविवारी करा हे उपाय; पैशांची कमतरता होईल दूर

Anjali Potdar

रविवार हा सूर्य देवाला समर्पित असतो. रविवारी काही उपाय केल्यास सूर्यदेवाची विशेष कृपा होते असं मानलं जातं. ज्योतिष शास्त्रामध्ये रविवाच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आलेत.

प्रत्येक व्यक्तीला त्याचं आयुष्य सुककर हवं असतं. आयुष्य चांगलं जावं म्हणून प्रत्येक व्यक्ती रात्रंदिवस मेहनत करतो. परंतु अनेक वेळा असं घडतं की, तुम्ही कितीही काम केलं तरी अपेक्षित परिणाम मिळत नाही.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, शास्त्रामध्ये असे काही उपाय आहेत जे केल्यास माणसाला जीवनात प्रगतीची संधी मिळू शकणार आहे. यामुळे माता लक्ष्मीही प्रसन्न होते. आज आम्ही तुम्हाला तुम्हाला काही रविवारी कराव्या लागणाऱ्या उपायांची माहिती देणार आहोत, ज्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

लक्ष्मी प्राप्तीसाठी खास हटके उपाय

१. एखाद्या शुभ दिवशी श्री यंत्राची स्थापना करावी. श्रीयंत्र शक्यतो पिरॅमिडचे जड आणि पंचधातूचे असावे. यावर मंगळवारी, शुक्रवारी व पौर्णिमेला कुंकुमार्चन करून लक्ष्मीचा जप कमळगट्टयाच्या माळेवर एक माळ करावा.

२. श्री सूक्त हे सोळा वेळा १६ महिन्यापर्यंत वाचावे. आपल्या घरी लक्ष्मीचा तुटवडा पडणार नाही. उद्योगाचे आणि पैसे कमावण्याचे निरनिराळे मार्ग उपलब्ध होतील.

३. अनेकांच्या घरी लक्ष्मी येते पण ती स्थिर राहत नाही. काही वेळेला अचानक, अकस्मिक, अवाढव्य खर्च उभे राहतात. त्यामुळे धावपळ होते अशा जातकांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा याचा फायदा होईल.

४. लक्ष्मी उपासना करताना महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत हे मार्गशीर्ष महिन्यातील करावे.

५. वैभव लक्ष्मीचे व्रत ११ किंवा २१ शुक्रवार करावे.

६. ऋग्वेदातील श्रीसूक्त रोज म्हणावे.

७.रोज घरासमोर सडा रांगोळी करावी. तशी सोय नसल्यास दारासमोर किंवा देवासमोर कमळ आणि स्वस्तिक आवश्य काढावे.

८. लक्ष्मी गायत्री चा जप १०८ वेळा करावा. |महालक्ष्मैं च विद्महे विष्णुपत्नैं च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात|

९. ओम् श्रीं नमः| या मंत्राचा एक हजार जप करावा. दर शुक्रवारी उपवास करावा. संध्याकाळी देवीला लाल फुल आणि मि मिष्टांनाचा नैवेद्य दाखवून उपवास सोडावा. अकरा शुक्रवार असे करावेत आर्थिक प्रश्न सुटतील.

१०. पिंपळाच्या वृक्षाच्या बुंध्यात पाणी, हळद-कुंकू, फुल, पांढरे तीळ आणि दूध असे "ॐ चैतन्य अश्वत्थाय य शरणं मम "असे म्हणत सोडावे. असे पाच गुरुवार करावे. याने श्रीविष्णूची पूजा होते आणि लक्ष्मी प्रसन्न होते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJPInternal Politics: पहिली यादी जाहीर होताच भाजपमध्ये अंतर्गत कलह, या उमेदवारांच्या नावाला विरोध

Maharashtra News Live Updates: जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ करणार: भाजप उमेदवार राहुल आवाडे

Chandrashekhar Bawankule : जी जबाबदारी दिली ती पार पाडावी लागते; उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Pune Assembly Election: पर्वतीतून मिसाळ यांना चौथ्यांदा उमेदवारी; कोण आहेत माधुरी मिसाळ, जाणून घ्या

Hingoli Vidhan Sabha : हिंगोली विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर; बंडखोरीची शक्यता

SCROLL FOR NEXT