Dashank Yog saam tv
राशिभविष्य

Dashank Yog: 50 वर्षांनंतर बनणार दशांक योग; 'या' राशींचं नशीब चमकणार, मिळणार पैसा

Budh Guru Yog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध आणि देवांचा गुरु बृहस्पति यांनी एक शुभ योग निर्माण केला आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळेल ते आपण पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह योग्य वेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी या ग्रहांची इतर ग्रहांची युती होत असते. ग्रहांच्या या युतीचा सर्व राशींच्या जीवनावर काही ना काही परिणाम होत असतो. यावेळी गुरु आणि बुध दशांक योग तयार करणार आहेत.

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, ज्यावेळी बुध आणि गुरु हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून ३६ अंशांच्या कोनीय स्थितीत असतील, तेव्हा दशंक योग तयार होतो. या योगामुळे काही राशींना चांगला प्रभाव मिळू शकणार आहे तर काही राशींना या काळात पैसे मिळतील. यावेळी कोणत्या राशीला चांगला परिणाम मिळणार आहे.

मकर रास

दशांक योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती मिळू शकणार आहे. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. या वेळेमुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे.

मिथुन रास

दशांक योगाच्या निर्मितीमुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या दैनंदिन उत्पन्नात वाढ दिसून येणार आहे. नोकरी बदलण्याचा किंवा उच्च पदासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर आहे. एखादा प्रलंबित व्यवहार पूर्ण होऊ शकणार आहे.

कन्या रास

दशांक योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. यावेळी तुम्हाला मनाजोग्या गोष्टी मिळू शकणार आहेत. करियरच्या क्षेत्रात तुम्हाला नवी संधी मिळणार आहे. ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांनी नवी आणि चांगल्या ठिकाणी नोकरी मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism: या विकेंडला ट्रेकिंगचा प्लान करताय? पुण्याजवळ असलेले हे ३ किल्ले ठरतील बेस्ट ऑप्शन

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे

आता गट राहिलेला नाही, शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Mahim Fort : मुंबईचा सर्वात जुना ‘माहिम’ किल्ला कोणत्या नावाने ओळखला जायचा? वैभवशाली इतिहासात लपलेय रहस्य!

शिंदेसेनेच्या नेत्यासह 7 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT