Horoscope Today 30th August 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : मीन राशीसाठी लग्नाचा योग, तर तुळ राशीला होईल यशप्राप्ती; तुमच्या भाग्यात आज काय? वाचा

Anjali Potdar

आजचे पंचांग - शनिवार ३१ऑगस्ट २०२४ श्रावण कृष्णपक्ष शनिप्रदोष. तिथी-त्रयोदशी २७|४१. रास- कर्क. नक्षत्र-पुष्य. योग-वरीया. करण-गरज. दिनविशेष-त्रयोदशी वर्ज्य.

मेष - पाहुणे मंडळींच्या आगत - स्वागत यामध्ये आज व्यस्त रहाल. प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल. आनंदामध्ये वृद्धी होईल.

वृषभ - व्यवसायामध्ये काही चांगल्या घटना आज कानी येतील. भाग्यकारक दिवस राहणार आहे. स्वतःचा पराक्रमावर खूश व्हाल.

मिथुन - जुन्या गोष्टींमध्ये मन रमेल. आठवणींमध्ये दंग व्हाल. कुटुंबीयांच्या प्रेमाबद्दल कृतकृत्य भावना मनामध्ये येईल. विविध पदार्थांची आज लयलूट राहील.

कर्क - आनंदी क्षणांचा आजचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील सकारात्मकता वाढवणारा, नवीन संधी आयुष्यात घेऊन येणारा आजचा दिवस आहे.

सिंह - तब्येत तक्रारी देणारा आजचा दिवस आहे. मनस्ताप वाढेल. खर्च वाढतील. बंधन योग येतील. अडकून पडल्याची भावना येईल. नकारात्मकता वाढेल.

कन्या - सहज, सुलभ दिवस आहे. मनात येणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

तूळ - नवीन परिचयातून व्यवसाय वृद्धी होईल. करिअरमध्ये नवीन गोष्टी आणि वाटा सापडतील. सुयशप्राप्ती आहे.

वृश्चिक - नातवंडांच्या प्रेमाकडे ओढा असणार आहे. त्यांचा कौतुक यामध्ये दंग होऊन जाल. मोठ्या प्रवासाचे बेत आखाल.

धनु - चुकीच्या गोष्टींमध्ये अडकण्याचा आजचा दिवस आहे. ठरवून यापासून बाजूला रहा. जास्त कोणाच्या कामांमध्ये डोकवण्याचा प्रयत्न करू नका.

मकर - कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल. नवीन स्वप्नांना उभारी मिळेल. अर्थ आणि स्वार्थ यात द्विधेमध्ये रहाल. प्रथम मात्र प्राधान्य पैसे मिळवण्यासाठी द्याल.

कुंभ - सांधेदुखी, हाडांचे विकार आज त्रस्त करतील. मानसिकता थोडी उद्विग्न राहील. स्वतःचे स्वास्थ जपावे असे सांगणारा आजचा दिवस आहे.

मीन - प्रणयी दिवस आहे. प्रेमाची गुलाबी स्वप्ने बघाल. या प्रेमाची परिणीती लग्नात होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. दत्त उपासना विशेष साध्य होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

SCROLL FOR NEXT