Horoscope Today 25th May 2024 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : या राशींवर होणार शनिदेवाची कृपा; मनासारख्या घडतील गोष्टी; वाचा राशीभविष्य

Rashi Bhavishya 25 May 2024 : ग्रहमानानुसार तुमच्या राशीत आज काय लिहलं आहे. जाणून घ्या आजचे संपूर्ण १२ राशीचे भविष्य

Anjali Potdar

आजचे पंचाग २५ मे २०२४

वार - शनिवार. तिथी - कृ. द्वादशी नक्षत्र - जेष्ठा. योग - सिद्ध. करण - तैतील ०७.१५ नंतर गरज. रास - वृश्चिक १०. ३६ नंतर धनू. दिनविशेष - ११ नंतर चांगला.

मेष : वागण्यावर नियंत्रण ठेवा

आपला स्वभाव तसा तापट आहे. कामाच्या बाबतीत याच गोष्टी आज नडतील त्यामुळे आपल्या वागण्यावर नियंत्रण ठेवा.

वृषभ : मनासारख्या गोष्टी घडतील

बऱ्याच गोष्टी मनासारखा होण्याचा आजचा दिवस आहे. काम असो, घर असो यश मिळणार आहे. आपल्या स्वभावाप्रमाणे आज खर्चही होणार आणि कामही करणार असा संमिश्र दिवस आहे.

मिथून : ठाम मत ठेवा

काही वेळेला निर्णयाच्या बाबतीत व्दिधा मनस्थिती घातक ठरते. म्हणून असे निर्णय घेण्यासाठी मत ठाम ठेवा म्हणजे अडचणी पुढे उभ्या राहणार नाहीत. तब्येत जपा.

कर्क : योग्य निर्णय घ्या

अति संवेदनशील असणे हे कलियुगात गुन्हाच आहे म्हणावे लागेल. तसा आपला स्वभाव आहे. उगाच कोणत्याही गोष्टीत आज वाहत जाऊ नका. आपल्याला योग्य अयोग्य यातील एक निर्णय आज घ्यावा लागेल.

सिंह : उपकारांची परतफेड कराल

"मरावे परी कीर्तिरूपे उरावे" अशी आपली जगण्याची धाटणी आहे. करेन तर नीटच नाही तर करणार नाही असा आपला स्वभाव. यातच स्वभावाप्रमाणे आज अनेकांचे उपकार फेडण्यात आपला दिवस जाईल.

कन्या : हुशारीचा मार्ग निवडा

आपण हुशार निश्चितच आहात. पण या हुशारीचा योग्य तो मार्ग कोणता हे आज निवडा. पराक्रम तर आहेच व होणारच पण त्यासाठी नक्की कोणाबरोबर जायचे हे विचार करा आणि मग पुढे चला. कधी कधी एकटा मार्ग जास्त सोयीचा असतो.

तुळ : हाती पैसा राहील

सर्व गोष्टींची हौस आपली आपण पुरवतोच पण कुटुंबीयांची सुद्धा पुरवताना आज नाकीनऊ येईल. पण याला दुसरा पर्यायच नसेल म्हणून पैशासाठी हात आज राहील.

वृश्चिक : सकारात्मकता वाढेल

"केल्याने होत आहे रे आधी केलेची" पाहिजे असा आजचा आपला दिवस आहे. खूप गोष्टी कराल. आनंदाने व्यक्त व्हाल. सकारात्मकता वाढेल.

धनु : मनस्थितीवर नियंत्रण ठेवा

कधी होणार तर कधी माणूस" असा आपला स्वभाव आहे. काय करायचे आपणच आपल्याला खूपदा उमगत नाही. मग इतरांनाही आपला त्रास होतो. त्यामुळे आज मनस्थितीवर नियंत्रण ठेवा.

मकर : आज आर्थिक लाभ होतील

आपण पैशाच्या बाबतीत कंजूस आहात. कंजुषी आपला स्वभाव आहे. अर्थात काही वेळेला या गोष्टी बऱ्या ठरतात. म्हणून अनेक लाभ आज मिळताना दिसतील.

कुंभ : जीव ओतून काम करा

वायू तत्वात महत्वाची असणारी आपली बौद्धिक रास. कामाच्या ठिकाणी जीव ओतून काम कराल .काही वेळेला माझं आणि तुझं हा भेदभाव आपण करत नाही. त्यामुळे सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आज काम होईल.

मीन : सुखाची ओंजळ भरणार

खूप साधे सहज आयुष्य आपल्याला जगायला आवडते. खूप काही इच्छा ठेवतही नाही आणि मारतही नाही. आजचा दिवस असाच भगवंताच्या कृपेने सुखाची ओंजळ भरून देणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amdar Niwas Canteen : मोठी बातमी! आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द; अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई

Dancing Car : आता काय म्हणावं? दोघांचा ताबा सुटला, दिवसाढवळ्या कारमध्येच जोडप्याचा रोमान्स, एकमेकांचे कपडे काढले अन्..., व्हिडिओ व्हायरल

गुंठाभर जमिनीचा ७/१२ सहज मिळणार, तुकडाबंदी कायदा रद्द करणार; सरकारची विधानसभेत घोषणा

पर्यटनासाठी लागणार तिकीट, धबधब्यावर जायचंय तर खटाखट पैसे मोजा; प्रशासनाचा निर्णय काय?

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT