Daily Horoscope Today Today Saam TV
राशिभविष्य

Daily horoscope today: महिन्याचा शेवट १२ राशींसाठी कसा होणार? या ५ राशींचं नशीब चमकून धनलाभ होणार, वाचा राशीभविष्य

Daily horoscope for all zodiac signs today: आज मंगळवारचा दिवस असून महिन्याचा दिवस आहे. आजच्या दिवशी ग्रहांची स्थिती कशी आहे ते पाहूया आणि तुमचं राशीभविष्य पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

मेष रास

मानसिक स्थितीकडे खूप लक्ष द्यावं लागणार आहे. जर तुम्हाला कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल, तर मानसिकदृष्ट्या तुम्ही त्या गोष्टीसाठी तयार नाही, असं वाटतं, मग तो महत्त्वाचा निर्णय आता थांबवा.

वृषभ रास

आजच्या दिवशी तुमच्या आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या. घरगुती भांडणं वाईट रूप धारण करू शकतात. तुमचा व्यवसाय चांगला चालला आहे. जवळ हिरवी वस्तू ठेवणं शुभ ठरणार आहे.

मिथुन रास

आजच्या दिवशी तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या मुलांकडून तुम्हाला काही आर्थिक मदत मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारण्याची बातमी मिळू शकते. कामच्या ठिकाणी तुम्हाला चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे.

कर्क रास

आजच्या दिवशी तुम्हाला तोंडाच्या समस्या जाणवू शकतात. त्याचप्रमाणे पैसे बुडण्याची चिन्हे आहेत. आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. व्यवसायात तुम्हाला मोठं डील मिळणार आहे. मात्र ते स्विकारताना नीट विचार करा.

सिंह रास

बिघडणारी मानसिक स्थिती, चिंता, अस्वस्थता असा आरोग्यावर परिणाम होतो. प्रेम आणि मुलांची स्थिती चांगली आहे. आजच्या दिवशी तुमचा व्यवसाय चांगला चालणार आहे. जवळ पिवळी वस्तू ठेवणं शुभ आहे.

कन्या रास

अतिरिक्त खर्चामुळे मन अस्वस्थ होणार आहे. डोकेदुखी, डोळे दुखणं असे त्रास होण्याची शक्यता आहे. प्रेम आणि मुलांची स्थिती चांगली आहे. व्यापारातही चांगली संधी मिळू शकणार आहे.

तूळ रास

उत्पन्नाचे स्रोत थोडे अडलेले दिसतात पण उत्पन्नात अधूनमधून वाढ होणार आहे. आरोग्य चांगलं राहणार आहे. प्रेम, संतती यांची स्थिती थोडी मध्यम असते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची तुम्हाला मदत मिळणार आहे.

वृश्चिक रास

राजकीय परिस्थिती थोडी मवाळ दिसत आहे. उच्च अधिकाऱ्यांच्या क्रोधाला बळी पडू शकता. आरोग्य मध्यम राहणार आहे. व्यवसाय मध्यम उत्पन्न मिळणार आहे. कोर्टाच्या केसेसमध्ये तुमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागणार नाही.

धनु रास

आजच्या दिवशी प्रवास त्रासदायक असू शकतो. शक्य असल्यास आता प्रवास करू नका. आरोग्य चांगलं राहणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही सुरु केलेला व्यवसाय चांगला होणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे.

मकर रास

दुखापत होऊ शकणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडचण येण्याची शक्यता आहे. परिस्थिती प्रतिकूल आहे. हळू गाडी चालवा. आरोग्याकडे लक्ष द्या.

कुंभ रास

तुमच्या पार्टनरची काळजी घ्या. प्रियकर आणि मैत्रिणीच्या भेटीत वाद होऊ शकतो. पोटाच्या आजाराची समस्या आहे. नोकरीत समस्या येण्याचा धोका आहे. जवळ हिरव्या वस्तू ठेवा.

मीन रास

आजच्या दिवशी शत्रूंचे वर्चस्व राहणार आहे. परंतु शत्रू काही प्रमाणात त्रास देण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही वर्चस्व गाजवणार आहात. कोणत्याही बाबतीत विजय तुमचाच होईल. आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तांब्याची वस्तू दान करणं शुभ ठरेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे 2 गटात राडा

Weak Heart Signs: हातांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

Sunday Horoscope: अचानक पैसा येईल, ५ राशींवर सुर्यदेव होणार प्रसन्न; वाचा रविवारचे राशीभविष्य

ICC Rules : क्रिकेट विश्वात उडणार खळबळ; आयसीसी बदलणार ४ नियम, सामना सुरू असतानाच चेंडू बदलणार रंग

Joint Pain Relief Tips: लहान वयातच तुम्हाला हाडं आणि सांधेदुखीचा त्रास होतोय का? या उपायांमुळे मिळेल आराम

SCROLL FOR NEXT