Love Horoscope: Will today bring sweet news or breakup? Mercury’s transit influences zodiac relationships. saam tv
राशिभविष्य

Daily Horoscope: गोड बातमी मिळणार की ब्रेकअप होणार; प्रेमी जोडप्यांसाठी कसा असेल बुधवारचा दिवस?

Astrology Predictions : ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाने राशीत भ्रमण केले आहे. या भ्रमणाचा परिणाम १२ राशींच्या लोकांच्या प्रेम जीवनावर होईल. बुधवारी बुध ग्रहाच्या कृपेने तुमच्या प्रेम जीवनातील आनंद वाढेल की नाही, हे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • बुध ग्रहाच्या गोचरामुळे प्रेम जीवनात बदल संभव.

  • १७ सप्टेंबर २०२५ रोजी महत्त्वाचे नक्षत्र व योग तयार.

  • काही जोडप्यांना गोड बातमी तर काहींना तणावाचा अनुभव.

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने १७ सप्टेंबर २०२५ हा दिवस महत्त्वाचा आहे. या दिवशी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आणि द्वादशी असतील. यासोबतच पुनर्वसु नक्षत्र, पुष्य नक्षत्र, परिघ योग, शिवयोग, बाव करण, बलव करण आणि कौलव करण तयार होत आहे. यासह बुद्धी , त्वचा, व्यापाराचे दाता बुध ग्रहाने कन्या राशीमध्ये गोचर केलं होतं. या संक्रमणामुळे बहुतेक लोकांच्या प्रेम जीवनात बदल होतील.

मेष

२०२५ मध्ये लग्न झालेल्या मेष राशीच्या लोकांना बुध ग्रहाच्या आशीर्वादाने १७ सप्टेंबर रोजी चांगली बातमी मिळू शकते. ज्यांचे लग्न अनेक वर्षांपासून झाले आहे त्यांच्या प्रेम जीवनात कोणताही सकारात्मक बदल दिसणार नाही.

वृषभ

नवविवाहित जोडप्यांसाठी १७ सप्टेंबर रोजी बुध ग्रहाच्या आशीर्वादाने चांगली बातमी मिळू शकते. दुसरीकडे ज्यांचे लग्न अनेक वर्षांपासून झाले आहे, त्यांच्यासाठी हा दिवस आनंदाऐवजी आव्हाने घेऊन येणारा ठरेल. त अनेक लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागेल, अशी अपेक्षा आहे.

कर्क

कर्क राशीचे विवाहित जातकांसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक ठरेल. ते जोडीदारासोबत असतानाही प्रेमाची कमतरता जाणवेल, ज्यामुळे तुम्हाला दुःख होईल.

सिंह

या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस त्रासदायक ठरेल. तुमचा जोडीदार तुमच्या गरजांकडे दुर्लक्ष करेल म्हणून विवाहित लोक तणावात असतील. याशिवाय तुमचे तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी भांडण होईल, परंतु दिवसाच्या अखेरीस तुमचा राग शांत होईल. तुम्ही पुन्हा तुमच्या आनंदी वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल.

कन्या

विवाहित कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराच्या बदललेल्या वागण्यामुळे समस्यांना तोंड द्यावे लागेल. ज्याबद्दल त्यांना त्यांच्याशी बोलण्याची संधीही मिळणार नाही. उलट चिडचिडेपणा निर्माण होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांवर विनाकारण रागावाल

तूळ

तूळ राशीच्या लोकांनी त्यांच्या इच्छा त्यांच्या प्रियकराला उघडपणे व्यक्त कराव्यात. तरच तुम्ही तुमच्या मानसिक तणावातून मुक्त होऊ शकाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT