मेष: जोडीदारासोबत वाद घालू नका.
मेष राशीच्या लोकांसाठी आज दिवसाची सुरुवात थोडी कमजोर राहील. व्यवसायात चिंतेत राहाल. तुम्ही तुमच्या मेहनतीत कोणतीही कसर सोडू नये. जोडीदारासोबत अजिबात वाद घालू नका.
वृषभ: कोणतीही गुंतवणूक करणे टाळा
आज तुमचे काम इतर कोणावर सोडू नका. कामात स्वावलंबी राहून पुढे जाऊ. आज शक्यतो कोणतीही गुंतवणूक करणे टाळा, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.
मिथुन: चांगली बातमी कानी येईल.
आज तुम्ही व्यवसायाशी संबंधित महत्वाचे निर्णय घेऊ शकता. कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी कानी येईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात कोणतीही कसर ठेवू नये.
कर्क: व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगा.
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार. तुमच्या मनमानी वागण्यामुळे लोक त्रस्त होतील. वाहन चालवताना काळजी घ्या. कोणतेही वचन तुम्ही पूर्ण कराल. व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगा.
सिंह: घाईघाईने निर्णय घेणे टाळा.
आज जुन्या चुकांमधून धडा घ्यावा लागेल. कामाची जबाबदारी जबाबदारी इतरांवर टाकू नका. कुणाच्याही बोलण्याचे वाईट वाटू घेऊ नका. घाईघाईने निर्णय घेणे टाळा.
कन्या: भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल.
आज तुम्ही तुमचा वेळ एकाग्र करण्यात घालवाल. आई-वडिलांची सेवा करण्यासाठी थोडा वेळ काढा. आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये शिथिलता आणू नका. भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल.
तूळ: खाण्याच्या सवयींवर लक्ष द्या.
कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. कोणाच्या सल्ल्याने भांडणात पडू नका. तुमच्या खाण्याच्या सवयींवर पूर्ण लक्ष द्या. कुटुंबातील सदस्यासोबत काही मुद्द्यावरून तुमचा वाद होऊ शकतो.
वृश्चिक: नोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.
आज तुम्ही पैशाशी संबंधित योजना कराल. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. तुमच्या कौटुंबिक समस्या एकत्र सोडवा, अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.
धनु: प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील.
आज तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदारीने वागा. प्रतिस्पर्ध्याच्या बोलण्याने प्रभावित होण्याचे टाळा. कुटुंबियांना घेऊन धार्मिक कार्यक्रमाला जाल.
मकर: वाहने जरा जपून चालवा.
आज तुमचे कोणतेही काम अडथळ्याशिवाय पूर्ण होईल. मुलाला नवीन नोकरी मिळू शकते. दुपारनंतर धनलाभाचा योग आहे. फक्त वाहने जरा जपून चालवा.
कुंभ: कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या
आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. तुम्हाला तुमच्या मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळेल.
मीन: नवीन घर खरेदी करू शकता.
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असेल. जास्त खर्चामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. नवीन घर खरेदी करू शकता. घाईघाईने निर्णय घेणे टाळा. महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी आई-वडिलांचा सल्ला घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.