मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी उस्ताहाचा असेल. कामाच्या ठिकाणी नव्या जबाबदाऱ्या मिळतील. पैशाची देवाणघेवाण करताना सावध राहा. विचारपुर्वक निर्णय घ्या.
वृषभ : आज पैशाच्या बाबतीत थोडं सावध राहण्याची गरज आहे. अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो. कुटुंबातल्या व्यक्तींशी संवाद चांगला राहील आणि रखडलेली कामं मार्गी लागण्याची शक्यता आहे.
मिथुन : आज तुमच्या बोलण्याचा आणि विचारांचा इतरांवर चांगला प्रभाव पडेल. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. मात्र, वरिष्ठांशी बोलताना शब्द जपून वापरा.
कर्क : आज प्रवासाचे नियोजन करत असाल तर विशेष काळजी घ्या. कामाच्या व्यापामुळे थोडी धावपळ होऊ शकते. अनावश्यक खर्च टाळा आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.
सिंह : आज तुमच्यात काम करण्याची ऊर्जा आणि उत्साह भरपूर असेल. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी चांगली संधी मिळू शकते. मात्र, आर्थिक व्यवहार आणि बँकेशी संबंधित कामे तपासून करा.
कन्या : आज जोडीदार किंवा जवळच्या व्यक्तींसोबत चांगला संवाद होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना महत्त्व मिळू शकते. वरिष्ठांशी बोलताना संयम ठेवा आणि कोणताही निर्णय घाईत घेऊ नका.
तूळ : आज व्यवसायात नवीन कल्पना सुचतील आणि आर्थिक प्रगतीसाठी मार्ग मिळू शकतो. मात्र, मोठ्या योजना आखताना त्यांचा नीट विचार करा. खर्चाचे नियोजन केल्यास भविष्यात फायदा होईल.
वृश्चिक : आज तुमच्यातील सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढलेला असेल. एखादे नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला ठरू शकतो. मित्रमंडळी आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील.
धनु : आज घरातील एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. घरातील वस्तूंची काळजी घ्या आणि अनावश्यक खर्च टाळा.
मकर : आज कामाच्या ठिकाणी नवीन लोकांशी संपर्क वाढू शकतो. तुमच्या कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. मात्र, बोलताना आणि काम करताना सावधगिरी बाळगा.
कुंभ : आज आर्थिक बाबींवर लक्ष देण्याची गरज आहे. वरिष्ठांशी किंवा कुटुंबातील मोठ्या व्यक्तींशी महत्त्वाची चर्चा होऊ शकते. नवीन संधी मिळाल्यास त्याचा विचारपूर्वक फायदा करून घ्या.
मीन : आज मनात नवीन विचार आणि योजना येतील. एखाद्या महत्त्वाच्या कामात तुमचे मत विचारात घेतले जाऊ शकते. प्रवास, शिक्षण किंवा नवीन गोष्टी शिकण्याच्या दृष्टीने दिवस उत्साहवर्धक ठरू शकतो.
टीप : वरील राशीभविष्य हे ज्योतिषशास्त्रीय अंदाजांवर आधारित असून ते केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.