Budhaditya rajyog Saam tv
राशिभविष्य

Budhaditya Rajyog: मंगळाच्या राशीत तयार झाला बुधादित्य राजयोग; 'या' राशींना मिळणार पैसा, व्यवसायातही होणार लाभ

Budhaditya Rajyog In Scorpio: ग्रहांचा राजकुमार बुध 29 ऑक्टोबरला वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे आणि त्यासोबतच 17 नोव्हेंबरला ग्रहांचा राजा सूर्य देव वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक वेळी ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या गोचरमुळे एका राशीत दोन ग्रहांचा संयोग होतो. ग्रहांचा राजकुमार बुध 29 ऑक्टोबरला वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे आणि त्यासोबतच 17 नोव्हेंबरला ग्रहांचा राजा सूर्य देव वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे.

यामुळे बुधादित्य राजयोग तयार होतोय. अशा स्थितीत या योगाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना याचा आर्थिक फायदा होणार आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना अधिक फायदा होणार आहे.

वृश्चिक रास

बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. हा महिना तुमच्या आयुष्यात नवीन आनंद घेऊन येणार आहे. तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्याच्या उत्तम संधी मिळणार आहेत. भागीदारीच्या कामातूनही तुम्हाला लाभ मिळू शकतो.

कर्क रास

बुधादित्य राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकणार आहे. उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळणार आहे. विवाहित लोकांचं आयुष्य चांगलं जाणार आहे.

मकर रास

बुधादित्य राजयोगाची निर्मिती मकर राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकणार आहे. पैशाच्या नवीन स्त्रोतांमधून पैसे कमवण्यात यशस्वी होणार आहात. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तो नक्कीच करा. गुंतवणूकीतून लाभ मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ढोल ताश्यांच्या गजरात करीरोडचा कैवारी गणपती विसर्जन मिरवणूक

Alibag Fort : अलिबागला गेल्यावर 'हा' ३०० वर्षे जुना समुद्री किल्ला पाहाच, ओहोटीच्या वेळी चक्क चालत जाता येतं

Liver disease symptoms: लिव्हर खराब होत असल्यास तुमच्या त्वचेवर दिसतात 4 लक्षणं; शरीरात दिसणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करू नका

Oil Price : खाद्यतेलाच्या दरांबाबत केंद्राचा मोठा निर्णय; कंपन्यांना MRP कमी करण्याचे निर्देश

Onion Oil Vs Rosemary Oil: कांद्याचे तेल की रोझमेरी तेल, केसांच्या वाढीसाठी कोणते तेल फायदेशीर?

SCROLL FOR NEXT