Shukra Ast 2025 saam tv
राशिभविष्य

Shukra Ast 2025: शुक्र ग्रह अस्त होण्यापूर्वी 'या' राशी होणार मालामाल; नव्या नोकरीसह घरी येणार पैसा

Shukra Ast 2025: वैदिक पंचांगानुसार, 19 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता शुक्र ग्रह अस्त होणार आहे आणि 23 मार्च 2025 रोजी पहाटे 5.52 वाजता तो पुन्हा उदयास येईल. 14 मार्च 2025 रोजी होळीच्या दिवशी शुक्र अस्त होण्यापूर्वी काही राशींसाठी हा कालखंड अत्यंत शुभ ठरणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भौतिक सुख, वैवाहिक सुख, कला, भोग, यांचा कारक वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये शुक्र ग्रह मानला जातो. शुक्राला शास्त्रांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. ठराविक काळानंतर शुक्राच्या हालचालीत बदल होतो. गोचप्रमाणे शुक्र ग्रह उदय आणि अस्त देखील होतो.

वैदिक दिनदर्शिकेनुसार शुक्र 19 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता अस्त होणार आहे. जो 23 मार्च 2025 रोजी पहाटे 5.52 वाजेपर्यंत या अवस्थेत राहणार आहे. आज म्हणजेच 14 मार्च 2025 रोजी होळीला शुक्र अस्त होण्यापूर्वी काही राशींना फायदा होणार आहे. यावेळी हा फायदा कोणत्या राशींना होणार आहे ते पाहूयात.

मेष रास

आज मेष राशीच्या लोकांना होळीवर विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. शुक्राच्या आशीर्वादाने अविवाहित व्यक्तींना खरं प्रेम मिळू शकतं. या काळात तुम्हाला घरातही आनंदाचं वातावरण राहणार आहे. शेजाऱ्यांशी मतभेद झाल्यास संबंध सुधारण्याची शक्यता आहे. स्वत:चा व्यवसाय आहे त्यांना आर्थिक फायदा होणार आहे.

वृश्चिक रास

शुक्र अस्त होण्यापूर्वी अविवाहित लोकांना आपला जीवनसाथी मिळू शकणार आहे. दापत्यामध्ये सुरू असलेला दुरावा संपुष्टात येणार आहे. तरुणांचं संवाद कौशल्य सुधारू शकणार आहे. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या सुवर्णसंधी प्राप्त होऊ शकतात.

कर्क रास

या काळात जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतीत करणार आहात. नातेवाइकांशी वाद झाल्यास वाद मिटण्याची शक्यता आहे. ज्येष्ठांचे आरोग्य उत्तम राहणार आहे. या वेळी कोणताही गंभीर आजार होणार नाही. अविवाहित लोकांसाठी नातेसंबंध येऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून दुकानदारांना आज मोठा नफा मिळू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

SCROLL FOR NEXT