Guru-Budh Yog saam tv
राशिभविष्य

Guru-Budh Yog: 2 दिवसांनी मेष, मकर राशींवर होणार पैशांचा पाऊस, गुरु-बुधाच्या संयोगाने पाहा अजून काय काय मिळणार?

Guru Budh Labh Drishti 2025: ज्योतिष्य शास्त्रामध्ये ग्रहांच्या चालीला विशेष महत्त्व देण्यात आलंय. यामध्ये गुरु आणि बुध यांची चाल देखील महत्त्वाची आहे. या दोन ग्रहांमुळे कोणाला लाभ मिळणार ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. या नवग्रहांमध्ये गुरु म्हणजेच बृहस्पती ग्रह एका पॉवरफुल ग्रह मानला जातो. हा ग्रह जवळपास एक वर्ष एका राशीमध्ये राहतो. सध्या गुरु हा वृषभ राशीमध्ये विराजमान आहे. तर दुसरीकडे ग्रहांचा युवराज बुध ग्रह मीन राशीमध्ये आहे.

२ दिवसांनी म्हणजेच ५ मे रोजी दोन्ही ग्रह एकमेकांपासून ६० अंशांवर असणार आहेत. ज्यामुळे एक शक्तिशाली त्रिएकादश योग तयार होईल. याला लाभ दृष्टी असंही म्हटलं जातं. ही दृष्टी खूप फलदायी मानले जाते. गुरु-बुध ग्रहाची शुभ दृष्टी काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. या राशी कोणत्या आहेत ते पाहूयात.

मेष रास

या राशीच्या लोकांसाठी गुरु आणि बुध ग्रहाचा त्रिएकादश योग खूप लकी ठरू शकतो. या काळात तुमचा आदर आणि सन्मान वेगाने वाढणार आहे. जर तुम्ही कोणत्याही कामात मेहनत केली असेल तर तुम्हाला यश मिळू शकणार आहे. यावेळी तुम्हाला आर्थिक अडचणींपासून मुक्तता मिळू शकणार आहे.

मिथुन रास

या राशीच्या लोकांचे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं पुन्हा एकदा सुरू होणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या आता संपणार आहेत. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवण्यात येऊ शकणार आहे. आनंद तुमच्या आयुष्याच्या दारावर ठोठावू शकतो.

मकर रास

या राशीच्या लोकांसाठी बुध आणि गुरु ग्रहाचा त्रिएकादश योग अनुकूल ठरू शकणार आहे. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचा करार होऊ शकणार आहे. वैवाहिक जीवनात फक्त आनंदच असू शकणार आहे. बऱ्याच काळापासून थांबलेले काम पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किती पगार दिला जात होता?

Mix Vegetable Cutlet: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा मिक्स भाज्यांचे क्रिस्पी कटलेट; ५ मिनिटात होईल तयार

Viral Video: कष्टाची ताकद काय असते? ६० किलो वजन उचलणाऱ्या शेतकऱ्याच्या वाघीणीचा व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Mayor List : तुमच्या शहराचा कारभारी कोण? मुंबई, ठाण्यापासून सोलापूर ते नागपूरपर्यंत २९ महापालिकांच्या महापौर-उपमहापौरांची संपूर्ण यादी

Rahul Gandhi: हे ट्रेड डील नाही तर होलसेल सरेंडर; राहुल गांधींच्या विधानाने लोकसभेत गदारोळ

SCROLL FOR NEXT