Rahu Gochar saam tv
राशिभविष्य

Rahu Gochar: होळीनंतर पापी ग्रह राहू बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींना मिळणार पैसाच पैसा

Rahu Gochar 2025: होळीच्या नंतर म्हणजेच १६ मार्च रोजी राहू त्याच्या राशीत बदल करणार आहे. यावेळी त्याचा कसा परिणाम होणार आहे ते पाहूयात.पूर्वाभाद्रपद नक्षत्रात पापी ग्रह राहूच्या प्रवेशामुळे अनेक राशींना फायदा होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, राहूला पापी ग्रह मानलं जातं. राहू ग्रहाला कलियुगाचा राजा म्हटलं जातं. ज्यावेळी राहू त्याच्या नक्षत्रामध्ये बदल करतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो. होळीच्या नंतर म्हणजेच १६ मार्च रोजी राहू त्याच्या राशीत बदल करणार आहे. यावेळी त्याचा कसा परिणाम होणार आहे ते पाहूयात.

१६ मार्च रोजी, राहू संध्याकाळी ६:५० वाजता पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. जर राहू गुरुच्या नक्षत्रात गेला तर त्याला गुरुचे ज्ञान मिळू शकणार आहे. पूर्वाभाद्रपद नक्षत्रात पापी ग्रह राहूच्या प्रवेशामुळे अनेक राशींना फायदा होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश होणार आहे ते पाहूयात.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तुमच्या आयुष्यातील काही ना काही परिणाम तुमच्यासाठी खूप सकारात्मक असणार आहेत. आयात आणि निर्यात व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा कल अध्यात्माकडे असणार आहे. तुम्हाला परदेशात जाण्याची संधी देखील मिळू शकते.

मिथुन रास

या राशीच्या लोकांसाठी राहूचा पूर्वभाद्रपद नक्षत्रात प्रवेश फायदेशीर ठरू शकणार आहे. नोकरीत पदोन्नती मिळण्याचीही पूर्ण शक्यता आहे. आयात आणि निर्यात व्यवसाय करणाऱ्या लोकांना खूप नफा मिळू शकतो. मे महिन्यात राहू नवव्या घरात प्रवेश करणार आहे. मग तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. परदेश प्रवासाचे स्वप्नही पूर्ण होऊ शकतं.

वृश्चिक रास

राहूच्या स्थितीत होणारा बदल या राशीच्या लोकांसाठीही अनुकूल ठरू शकतो. या राशीत राहू पाचव्या घरातून जाणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना खूप आर्थिक लाभ मिळू शकतात. तुम्ही कर्जातून मुक्त होऊ शकता. नवीन कामाबद्दलचा गोंधळ आता संपू शकेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT