Bhadra Rajyog In Kundli saam tv
राशिभविष्य

Bhadra Rajyog: 4 दिवसांनी बनणार भद्र महापुरुष राजयोग; 'या' राशींचं नशीब अचानक पालटणार

Bhadra Rajyog In Kundli: 23 सप्टेंबरला बुध ग्रह स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या गोचरमुळे भद्र राजयोग निर्माण होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये पंच महापुरुष राजयोगाचं वर्णन करण्यात आलं आहे. जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात, त्यावेळी ग्रहाचं गोचर होतं. काही ग्रहांच्या गोचरमुळे राजयोग देखील तयार होतात. येत्या काळामध्ये भद्र महापुरुष राजयोग तयार आहे.

23 सप्टेंबरला बुध ग्रह स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे भद्रा महापुरुष राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगाचा निर्मितीचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. या काळात काही राशींना अचानक पैसे मिळू शकतात. तर काही राशींवर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा लाभ घेता येणार आहे.

सिंह रास

भद्रा महापुरुष राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने फायदा होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमच्या आर्थिक खात्यांवर नियंत्रण ठेवणं सोपं होणार आहे.

मिथुन रास

भद्रा राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या सुरू असलेल्या अनेक योजना पूर्ण होणार आहेत. वडिलोपार्जित संपत्तीचं सुख मिळू शकणार आहे. कुटुंबातील एका व्यक्तीच्या माध्यमातून आर्थिक लाभ होऊ शकणार आहे.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी भद्रा राजयोगाची निर्मिती अनुकूल ठरू शकणार आहे. नोकरी आणि व्यवसायात विशेष प्रगती होऊ शकणार आहे. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या आयुष्यात नवे आणि चांगले बदल घडणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये खोमेनींची सत्ता धोक्यात, देशातील जनता का उतरली रस्त्यावर

Parbhani : आई, मावशीसह काकाचा ३ वर्षांपूर्वी जीव घेतला, आता आरोपीनं तुरुंगातील टॉयलेटमध्ये स्वतःलाच संपवलं

दोघे विवाहित, मुले गाढ झोपली होती; पहाटे पहाटे घरात विपरीत घडलं, महिलेनं बॉयफ्रेंडचं गुप्तांग कापलं

तरुणी पडली AI च्या प्रेमात, AIसोबत बांधली लग्नगाठ

Potato Fry Recipe: अवघ्या १० मिनिटांत बनवा कुरकुरीत बटाटा फ्राय

SCROLL FOR NEXT