Shatank Yoga 2025 saam tv
राशिभविष्य

Gajlaxmi Rajyog 2025: 12 वर्षांनंतर गुरु बनवणार शक्तीशाली योग; 'या' राशींवर मेहेरबान राहणार देवी लक्ष्मी, धनलाभाचे योग

Guru Shukra Yuti 2025: गुरु ग्रह म्हणजेच बृहस्पति सुमारे एक वर्ष एका राशीमध्ये राहतो. यावेळी गुरु ग्रहाच्या गोचरनंतर त्याची शुक्रासोबत युती होणार आहे. यावेळी गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्त्व देण्यात येतं. यामध्ये देवतांचा गुरु बृहस्पतिला यामध्ये खास स्थान देण्यात आलं आहे. शास्त्रानुसार, गुरु तब्बल एका वर्षाने राशी परिवर्तन करतो. त्यामुळे गुरु ग्रहाला एका राशीत पुन्हा येण्यासाठी तब्बल १२ वर्षांचा कालावधी लागतो. गुरुच्या गोचरचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो.

सध्या गुरु वृषभ राशीत असून मे महिन्यात तो मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. जवळपास १ वर्ष तो या राशीत राहणार आहे. यावेळी गुरुची दुसऱ्या ग्रहांसोबत युती होणार आहे. जुलै महिन्यात गुरुची शुक्रासोबत होणार आहे. ज्यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींना चांगला फायदा होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मिथुन रास

या राशींच्या व्यक्तींसाठी गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. या काळात अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येणार आहेत. तुम्हाला अपार धन-संपत्ती मिळू शकणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळू शकणार आहे. बिझनेसमध्ये चांगला लाभ मिळू शकणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

कन्या रास

या राशींच्या व्यक्तींना गजलक्ष्मी राजयोगाचा फायदा होणार आहे. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळू शकणार आहे. बरोजगारांना नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. तुमच्या आयुष्यात सुखाचे क्षण येऊ शकणार आहेत. दिर्घकाळापासून अडकलेला पैसा मिळणार आहे.

कुंभ रास

या राशीच्या पंचम भावात गुरु आणि शुक्राची युती होणार आहे. या राजयोगामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. तुमच्या सर्व योजना सफल होणार आहेत. नोकरीमध्ये बदल करायचा विचार करत असाल तर ही वेळ योग्य आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक

Shilpa Shetty Photos: लाल साडी अन् सडपातळ कंबर, शिल्पाच्या सौंदर्याने केले घायाळ

Rain : राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने झोडपलं; नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

Heart Attack: सकाळची ही सवय वाढवते हार्ट अटॅकचा धोका; रक्तवाहिन्या का होतात ब्लॉक?

Rajeev Deshmukh : ऐन दिवाळीत राजकीय वर्तुळात शोककळा; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिलेदाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

SCROLL FOR NEXT