वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला धन, ऐश्वर्य, प्रेम, सौंदर्य आणि सुख-सुविधांचा कारक मानलं जातं. त्यामुळे शुक्राच्या राशी परिवर्तनाचा किंवा चालीतल्या बदलाचा परिणाम सर्व राशींवर होत असल्याचं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. सध्या शुक्र वक्री अवस्थेत असून, पुढच्या ७ दिवस म्हणजेच १४ नोव्हेंबरपर्यंत काही राशींसाठी हे दिवस विशेष लाभदायी ठरू शकतो. कामातल्या अडचणी दूर होतील, दु:ख कमी होऊन आनंदात जीवन जगता येईल.
वृषभ राशीच्या लोकांसाठी पुढील सात दिवस सकारात्मक ठरू शकतात. नोकरी करणाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये एखादी चांगली बातमी मिळू शकते किंवा नवीन नोकरीची संधी चालून येऊ शकते. व्यावसायिकांना व्यवसायात प्रगती आणि आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील आणि प्रेमसंबंधांमधील वातावरणही आनंदी राहू शकते. मात्र, पैशांशी संबंधित जोखीम घेणे टाळा.
मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्राची वक्री चाल फायदेशीर ठरू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. मात्र, वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य विचार करा.
कर्क राशीच्या लोकांना नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. कामातील मेहनतीला योग्य ओळख मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुधारणा होऊ शकते. व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील.
सिंह राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने पुढील सात दिवस महत्त्वाचे ठरू शकतात. नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. सध्याच्या नोकरीतही परिस्थिती सुधारू शकते. व्यावसायिकांना नवीन डील मिळून आर्थिक फायदा होऊ शकतो. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल.
मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिक अडचणी हळूहळू कमी होण्याचे संकेत आहेत. नोकरीत प्रगती होऊ शकते आणि रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. परदेशाशी संबंधित संपर्कातून आर्थिक लाभ मिळू शकतो. वैयक्तिक आयुष्यातील समस्या दूर होऊन जोडीदारासोबत चांगला वेळ घालवता येईल. मात्र, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
महत्त्वाची टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रीय मान्यतांवर आधारित असून, त्याला निश्चित भविष्यवाणी समजू नये. आर्थिक निर्णय घेताना योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.