Makar Sankranti Ekadashi rare conjunction saam tv
राशिभविष्य

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला २३ वर्षांनंतर बनतोय एकादशीचा संयोग; जाणून घ्या पुजेचं महत्त्व आणि शुभ मुहूर्त

Makar Sankranti Ekadashi rare conjunction: हिंदू पंचांगानुसार यंदा २३ वर्षांनंतर मकर संक्रांती आणि एकादशीचा दुर्मिळ संयोग होत आहे. हा संयोग अत्यंत शुभ मानला जातो आणि धार्मिक दृष्ट्या विशेष महत्वाचा आहे.

Surabhi Jayashree Jagdish

या वर्षी सूर्यदेव 14 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहेत. मकर संक्रांतीचा उत्सव याच दिवशी साजरा होणार आहे. यावेळी मकर संक्रांती अत्यंत खास ठरणार आहे, कारण जवळपास 23 वर्षांनंतर मकर संक्रांतीला एकादशीचा संयोग होतोय. या दिवशी षटतिला एकादशी आहे. यापूर्वी मकर संक्रांती आणि एकादशीचा असा संयोग सन 2003 मध्ये झाला होता. चला पाहूया, या संयोगात मकर संक्रांतीची पूजा कशी करावी.

मकर संक्रांतीवर दोन शुभ योग

सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतील तेव्हा ते उत्तरायण होतात. म्हणजेच या दिवसापासून सूर्य उत्तर दिशेकडे गती करतो. यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी दोन शुभ योगही निर्माण होत आहेत. यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग यांचा समावेश आहे. या योगांमुळे दान-पुण्य आणि पूजेचं महत्त्व अनेक पटींनी वाढतं.

मकर संक्रांतीचे शुभ मुहूर्त

  • पुण्यकाल- 14 जानेवारी, दुपारी 03:04 ते संध्याकाळी 05:57

  • महापुण्यकाल- दुपारी 03:04 ते 03:28

  • स्नान-दानाचा मुहूर्त- सकाळी 09:03 ते 10:48

मकर संक्रांतीची पूजेची पद्धती

मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून पवित्र नदीत स्नान करावं किंवा घरात स्नान करावं. घरात स्नान करताना पाण्यात तिळांचा समावेश करणं शुभ मानण्यात येतं. स्नानानंतर सूर्यदेवाला तांब्याच्या लोट्यातील पाणी अर्पण करावं. त्यात लाल फुलं, तीळ आणि अक्षता घालाव्या. या वेळी “ॐ सूर्याय नमः” किंवा “ॐ घृणि सूर्याय नमः” मंत्राचा जप करावा.

यंदाच्या संक्रांतीसोबत एकादशी असल्यामुळे भगवान विष्णूची पूजा करणं आवश्यक आहे. त्यांना तिळापासून बनवलेले पदार्थ आणि फळांचा नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर गरजूंना दान-दक्षिणा द्यावी.

मकर संक्रांतीवरील दानाचं महत्त्व

षटतिला एकादशीच्या संयोगात आलेल्या या मकर संक्रांतीला काही विशेष वस्तूंचं दान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी अन्न, वस्त्र आणि धन यांसोबतच तीळ, गुळापासून बनवलेल्या वस्तूंचं दान केल्याने पुण्य मिळतं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT