Sun and Mercury Conjunction saam tv
राशिभविष्य

Mercury Mars conjunction: 50 वर्षांनी दसऱ्याच्या दिवशी बनणार दुर्मिळ संयोग; बुध-मंगळामुळे 'या' राशींना मिळणार नवी नोकरी

Mars And Budh Conjunction In Tula: हिंदू धर्मात दसरा (Dussehra) हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. या वर्षीचा दसरा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत खास असणार आहे. ५० वर्षांनंतर असा दुर्मिळ योग (Rare Combination) जुळून येत आहे, जेव्हा बुध (Mercury) आणि मंगळ (Mars) एकाच राशीत येऊन युती करतील.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार ग्रह ठराविक कालांतराने गोचर करतात. यावेळी काही ग्रहांची एकमेकांशी युती होते आणि या युतीचा परिणाम मानवजीवनावर तसंच जगभरातील घडामोडींवर दिसून येतो. येत्या 2 ऑक्टोबरला म्हणजेच दशऱ्याच्या दिवशी तूळ राशीत मंगळ आणि बुध युती होणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, बुध हा बुद्धीचा कारक मानला जातो. तर मंगळ हा शक्ती, साहस आणि उत्साहाचा कारक असून ग्रहांचा सेनापती मानला जातो. अशा वेळी बुध आणि मंगळाची युती म्हणजेच बुद्धी आणि शक्तीचा अद्भुत संगम होणार आहे. या संयोगामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. यावेळी कोणत्या राशींना अच्छे दिन येणार आहेत ते पाहूयात.

धनु राशि

धनु राशीच्या लोकांसाठी मंगळ-बुध युती अत्यंत लाभदायक ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. नवे उत्पन्नाचे मार्गही उघडणार आहेत. आर्थिक व्यवहार केल्यास तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळू शकणार आहे. या काळात गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.***

मेष राशि

मंगळ-बुध युती मेष राशीसाठी सकारात्मक परिणाम घडवणारी ठरू शकणार आहे. हा संयोग तुमच्या राशीपासून सप्तम भावात होणार आहे. त्यामुळे विवाहित व्यक्तींचं वैवाहिक जीवन अधिक आनंदी होणार आहे. व्यवसायात पार्टनरशिपमधून लाभ मिळू शकतो. तुमच्या साहसात आणि पराक्रमात वाढ होण्याची शक्यता आहे.

कर्क राशि

कर्क राशीसाठी मंगळ-बुध युती लाभप्रद ठरू शकणार आहे. हा संयोग तुमच्या राशीपासून चतुर्थ भावात होणार आहे. त्यामुळे भौतिक सुख-सुविधा वाढणार आहेत. वाहन किंवा मालमत्तेची प्राप्ती होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या चांगले लाभ मिळू शकतात. संपत्तीशी संबंधित लाभ होऊ शकणार आहे. बिझनेसच्या कामातून चांगला पैसा हाती येईल.6

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काँग्रेसच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे बंधू राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट; वाढदिवसानिमित्त शिवतीर्थावर दाखल

Karjat Tourism : डोंगर, दऱ्या अन् धबधबे; कर्जतजवळ प्लान करा दिवाळी वीकेंड, 'हे' आहे खास लोकेशन

Gold price : अवघ्या ६ मिनिटात सोनं ७,७०० रुपयांनी स्वस्त; सोन्याच्या दरात वर्षभरातील सर्वात मोठी घसरण

Thursday Horoscope: भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर ४ राशींचे नशीब बदलणार, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT