March 2025 Triple Rajyog saam tv
राशिभविष्य

Triple Rajyog : 500 वर्षांनंतर शुक्रादित्य, मालव्यसह बनणार 3 महाराजयोग; 'या' राशींच्या नशीबाचा तारा चमकणार

March 2025 Triple Rajyog : तीन विशेष राजयोगांमध्ये शुक्र आणि सूर्याचा 'शुक्रादित्य योग', बुध आणि सूर्याचा 'बुधादित्य योग' आणि शुक्र आणि बुधाचा 'लक्ष्मी-नारायण योग' यांचा समावेश आहे. हे दुर्मिळ राजयोग जवळपास पाच शतकांनंतर सक्रिय होत आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठरलेल्या वेळी भ्रमण करतात. यामुळे शुभ योग आणि राजयोग निर्माण होत असतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर त्याचप्रमाणे देश आणि जगावर दिसून येतो. मार्च महिन्यात ३ राजयोग तयार होत आहेत. या तीन राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात नव्याने आनंद येणार आहे.

या ३ राजयोगांमध्ये सूर्य-शुक्र ग्रहाचा 'शुक्रादित्य राजयोग', सूर्य-बुध ग्रहाचा 'बुधादित्य राजयोग' आणि शुक्र-बुध ग्रहाचा 'लक्ष्मी नारायण राजयोग' यांचा समावेश आहे. हे राजयोग जवळजवळ ५०० वर्षांनंतर निर्माण होणार आहेत. ज्यामुळे काही राशींचं नशीब चमकण्याची शक्यता आहे. या राशींना अचानक आर्थिक लाभासह प्रगतीच्या संधी मिळणार आहेत. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना धनलाभ होणार आहे ते पाहूयात.

मकर रास

३ राजयोगांची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी यश मिळणार आहे. सरकारी क्षेत्रात काही विशेष संधी पाहायला मिळू शकणार. व्यावसायिकांना व्यवसायात नवीन संधी मिळणयाची शक्यता आहे. नवीन योजना सुरू करण्यासाठी हा काळ योग्य आहे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी तीन राजयोगांची निर्मिती अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात कौटुंबिक संबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. यावेळी नवीन स्रोतांकडून उत्पन्न मिळू शकेल. नोकरी करणाऱ्यांना बंपर फायदे मिळू शकतात. मालमत्तेशी संबंधित निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत.

तूळ रास

३ राजयोगांची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. पैशाच्या आवकासाठी नवीन मार्ग तयार केले जाणार आहेत. व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात नफा मिळवण्याच्या संधी मिळू शकतात. तुम्ही कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास देखील करू शकता. तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT