Shani Dev Vakri In Meen saam tv
राशिभविष्य

Shani Vakri: 30 वर्षांनी मीन राशीत वक्री होणार शनी देव; 'या' राशींना मिळू शकणार छप्परफाड पैसा

Shani Dev Vakri In Meen: राशी बदलाप्रमाणे शनी वक्री आणि मार्गी देखील होता. यंदाच्या वर्षी शनी त्यांच्या हालचालीत बदल करणार असून ते वक्री चाल चालणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात असं वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. यामध्ये सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह म्हणजे शनी. शनी हा एका राशीत सुमारे अडीच वर्ष राहतो. राशी बदलाप्रमाणे शनी वक्री आणि मार्गी देखील होता. यंदाच्या वर्षी शनी त्यांच्या हालचालीत बदल करणार असून ते वक्री चाल चालणार आहेत.

ज्योतिष्य पंचांगानुसार, शनिदेव मार्च २०२५ मध्ये मीन राशीत प्रवेश करणार आहेत. शनिदेवाने ३० वर्षांनी मीन राशीत प्रवेश केला आहे. यानंतर शनी जुलै महिन्यात वक्री चाल चालणार आहे. शनीच्या या वक्री चालीचा सर्व राशींच्या व्यक्तींवर काही ना काही परिणाम होणार आहे. यामध्ये काही राशी अशा आहेत, ज्यांना याचा अधिक लाभ होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

कुंभ रास

शनिदेवाची वक्री चाल तुमच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. शनिदेव तुमच्या धन गृहात वक्री होणार आहेत. यावेळी तुम्ही अधिक मेहनत करू शकणार आहात. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकणार आहेत. आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिदेवाची वक्री हालचाल अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात नोकरी आणि व्यवसायात विशेष प्रगती होण्याची शक्यता आहे. एखाद्या मोठ्या प्रकल्पावर काम करत असाल तर आता त्याचे परिणाम तुमच्या बाजूने येणार आहेत. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ रास

शनिदेवाची वक्री गती तुमच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. या काळात तुमचं उत्पन्न प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगले पैसे मिळणार आहेत. व्यवसाय किंवा नव्या बिझनेसमध्ये गुंतलेल्यांसाठी हा काळ योग्य आहे. तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीचा फायदा होऊ शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT