एक्स्क्लुझिव्ह

VIDEO | नशेसाठी होतोय चक्क कफ सिरपचा वापर

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

सध्या थंड़ीचे दिवस सुरू आहेत. या दिवसात सर्दी-खोकल्याचा त्रास जास्त जाणवतो. अशावेळी अनेकजण कफ सिरप घेतात. पण मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये याच कफ सिरपचा वापर नशेसाठी केला जातोय. मोठ्या प्रमाणात तरूणाई कफ सिरपच्या आहारी जातीय. ड्रग्जला आळा घालण्यासाठी सध्या ऑपरेशन कमळी ही मोहिम हाती घेण्यात आलीय. त्यामुळे ड्रग्ज सहजासहजी मिळणं मुश्कील झालंय, परिणामी कफ सीरपचा वापर वाढलाय.. 


कफ सीरप हे औषध म्हणून घेतल्यास त्याचं प्रमाण ठरावीक असतं. पण नशेसाठी दोनशे मिलीची बाटली तरुण पितात. हे सीरप तत्काळ परिणाम दाखवतं. ड्रग्जप्रमाणे उत्तेजित करते आणि नंतर शरीर सुस्त करतं. सीरप अधिक प्रमाणात घेतल्यास ही धुंदी झोप आणते. 

कफ सीरपच्या बेकायदा विक्रीप्रकरणी ठोस कारवाईची गरज आहे. असं असताना अन्न आणि औषध प्रशासनाकडून गेल्या वर्षभरात नगण्य कारवाई करण्यात आलीय. त्यामुळे कफ सिरपच्या नशेचं प्रमाण वाढलंय. 

कफ सीरपच का?

कफ सीरप केमिस्टमध्ये सहज मिळतं.

अनेक केमिस्ट प्रिस्क्रिप्शन विचारत नाहीत.

खोट्या प्रिस्क्रिप्शनची शहानिशा केली जात नाही.


 त्यामुळे पालकांनो तुम्ही तुमच्या मुलांवर लक्ष ठेवा.. कफ सिरपची नशा तुमच्या पाल्यासाठी घातक ठरू शकते. आपला मुलगा कफ सिरपच्या आहारी तर गेला नाही ना ? याची खातरजमा करा....

WebTittle:: The use of cuff syrup for addiction

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar Pune | प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!

Today's Marathi News Live: अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट

Ruchira Jadhav: अवतरली सुंदरी... रुचिराचा मनमोहक साडी लूक!

Rahul Gandhi: सत्तेत आल्यास 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार, आरक्षणावर राहुल गांधींची मोठी घोषणा

Dindori Lok Sabha: आधी थोपटले दंड आता मिळवले हात; दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांची माघार

SCROLL FOR NEXT