Somnath Fatke
Somnath Fatke 
एक्स्क्लुझिव्ह

पुण्यात ऑर्केस्ट्रा कलाकार चालवतोय पावभाजीची गाडी

अश्विनी जाधव - केदारी

पुणे : जादुई हातांनी कलाविष्कार दाखवण्याऱ्या पुण्याच्या (Pune) एका ऑर्केस्ट्रा कलाकाराला त्याच हाताने आपल्या ग्राहकांना पावभाजी बनवून खाऊ घालावे लागत आहे, कोरोना (Corona) महामारीमुळे या कलाकाराची अशी बिकट अवस्था झाली आहे. Orchestra Artist in Pune Running Pav Bhaji Stall to Survive

गेल्या वर्षभरात कोरोना महामारीमुळे अनेक क्षेत्राना लॉकडाऊन चा फटका बसला आहे . अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे मोठे हाल झाले आहे, सांस्कृतिक क्षेत्र (Cultural Activity) ही याला अपवाद राहिलेले नाही, मोठ्या कलाकारांचे उत्पन्न जिथे थांबले तिथे ऑर्केस्ट्रा (Orcherstra) कलाकारांची (Artists) उपासमार होणे स्वाभाविकच  आहे, पुण्यातील तब्बल 38 वर्षांचा ऑर्केस्ट्रा चा अनुभव असलेले सोमनाथ फाटके. ऑर्केस्ट्रामध्ये  निरनिराळी वाद्ये ते वाजवतात. पण दुर्देवाने लोकांना आपल्या जादुई हातांचा कलाविष्कार दाखवण्या ऐवजी त्याच हाताने लोकांना पावभाजी बनवून खाऊ घालावे लागत आहे.  

अर्थात कुठलंही काम कमी अधिक दर्जाचे न मानणारे सोमनाथ फाटकेना मात्र नाईलाजाने हे काम स्वीकारावे लागले आहे. लॉकडाऊन मुळे ऑर्केस्ट्रा पूर्णपणे बंद पडला आहे. हाताला काही काम राहिलेले नाही, त्यामुळे रोजच्या उपजीविकेचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला, त्यामुळे तात्पुरता का होईना पण दुसरं काम शोधणं गरजेचं होतं या हेतूने त्यांनी सुरुवातीला सुकी मासळी विकण्याचे ही काम केले आहे, पण त्यातून काही भागेना म्हणून  पावभाजीची गाडी चालवायला घेतली. Orchestra Artist in Pune Running Pav Bhaji Stall to Survive

मेलडी मेकर्स, म्युझिकल पॅराडाईझ, गितो का सफर अशा नावाजलेल्या ऑर्केस्ट्रामध्ये सोमनाथ फाटके यांनी  वादन केले आहे, आणि विशेष म्हणजे 10 पेक्षा जास्त देशांमध्ये त्यांनी आपली कलाही सादर केलीय आहे. लॉकडाऊनच्या काळापासून ते अगदी आजपर्यंत छोट्या कलाकारांकडे सरकारचे लक्ष नाही, आम्हाला सरकार कडून अद्याप कुठलीही मदत मिळालेली नाही, आणि आता पुन्हा लॉकडाऊन ची शक्यता वर्तवली जातेय, खरंच लॉकडाऊन झाला, तर आम्ही जगायचं कसं हा यक्षप्रश्न  त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. 

Edited By-Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

SCROLL FOR NEXT