Girija Oak Dance In Zinda Banda Saam TV
मनोरंजन बातम्या

Zinda Banda Song Video : 'जिंदा बंदा'मध्ये झळकळी मराठमोळी अभिनेत्री, शाहरुख खानसोबत लावले जबरदस्त ठुमके

Girija Oak In Jawan : 'जिंदा बंदा' या गाण्यातून गिरीजाची झलक पाहायला मिळत आहेत.

Pooja Dange

Girija Oak Prabhu Dances With Shah Rukh Khan : शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'जवान' वेगवेगळ्या आयडिया अंमलात आणत आहेत. चित्रपटाचा प्रिव्ह्युव्ह , गाण्याचा प्रिव्ह्युव्ह या सगळ्याचा वापर करून निर्माते प्रेक्षकांची उत्सुकता वाढवता आहेत. तसेच चित्रपटाविषयी प्रेक्षकांचे मत देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

शाहरुख खानचे फॅन्स देखील या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. दरम्यान 'जवान'मधील शाहरुख खानचे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. 'जिंदा बंदा' असे या गाण्याचे नाव आहे.

शाहरुख या चित्रपटामध्ये गिरीजा ओक देखील आहे. गिरीजा चित्रपटाविषयी अपडेट तिच्या मीडियावर शेअर करत असते. गिरिजाने ती या चित्रपटामध्ये दिसणार असल्याचे देखील शेअर केले होतो. परंतु ती कोणत्या भूमिकेत दिसणार याची मराठी रसिकांना उत्सुकता होती.

दरम्यान 'जिंदा बंदा' या गाण्यातून गिरीजाची झलक पाहायला मिळत आहेत. या गाण्यात गिरीजा शाहरुखच्या मागे डान्स करताना दिसत आहे. हे संपूर्ण गाणं जेलमध्ये शूट करण्यात आलं आहे. आता यावरून गिरीजा या जेलमध्ये काय करत आहे, असा प्रश्न मनात येऊ शकतो.

याआधी जवानाच्या प्रिव्हयु टीझरमध्ये देखील गिरीजा झळकली होती. तर यावेळी जबरदस्त डान्स करताना गिरीजा दिसत आहे.

जवानच्या 'जिंदा बंदा' या गाण्यामध्ये शाहरुखच्या मागे अनेक स्त्रिया दिसत आहेत. या गाण्यात १००० फिमेल डान्सरसोबत शूट करण्यात आले आहे. हे गाणे हिंदीसह तामिळमध्ये वंधा एडम आणि तेलुगूमध्ये धुम्मे धुलीपेला या नावांनी प्रदर्शित करण्यात आले आहे.

शाहरुख खान आणि त्याच्या आगामी जवान चित्रपटाची इतकी क्रेझ आहे की अवघ्या ५ तासात या चित्रपटातील 'जिंदा बंदा' या गाण्याने ६ मिलियन व्ह्यूव टप्पा पार केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi Ladoo: लहान मुलं मेथीचे लाडू खायला नकार देतात? मग 'ही' ट्रिक वापरा आणि पाहा जादू!

Bluetooth Security: ब्लूटूथ हेडफोन, इअरबड्स वापरणाऱ्या मोठा धोका, सरकारने जारी केला इशारा

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

SCROLL FOR NEXT