United Kacche Web series
United Kacche Web series Instagram @zee5
मनोरंजन बातम्या

United Kacche Trailer: सुनील ग्रोव्हर पुन्हा येतोय.. नवी वेबसिरीज 'युनायटेड कच्चे'.. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार

Saam Tv

Sunil Grover Upcoming Web Series: प्रसिद्ध कॉमेडियन सुनील ग्रोव्हर सध्या त्याच्या आगामी 'युनायटेड कच्चे' या वेब सीरीजमुळे चर्चेत आहे. त्याच्या कॉमेडी वेबसीरीजचा ट्रेलर लाँच झाला आहे.

'युनायटेड कच्चे' या महिन्यात OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सुनीलच्या या आगामी कॉमेडी वेबसीरीजचा ट्रेलर रिलीज झाला असून, यामध्ये सुनील 'तेजिंदर टँगो गिल'च्या भूमिकेत दिसणार आहे.

तेजिंदर टँगो गिलला उत्तम आयुष्य जगता यावं यासाठी इंग्लंडला जायचे असते आणि त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असतो.

यासाठी तो त्याच्या कुटुंबाची जमीन गहाण ठेवतो, पण इंग्लंडमध्ये गेल्यावर त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यानंतर, तो इंग्लंडमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशातील नागरिकांना भेटतो, ज्यांना तेथे त्याच्यासारखी प्रगती करायची असते.

'युनायटेड कच्चे' या वेबसीरीजचा ट्रेलर खूप सुंदर आहे. ट्रेलरमध्ये तुम्हाला वेबसीरीजमधील वेगवेगळ्या छटा पाहायला मिळतात. या वेबसीरीजमध्ये लव स्टोरी देखील आहे. या वेबसीरीजमध्ये सुनील ग्रोव्हर स्टायलिस्ट अंदाजात दिसत आहे. त्याचा इंग्लंडला जाण्याचं आणि तिथे गेल्यावरचा संघर्ष यात दाखविण्यात आला आहे.

या वेबसीरीजमध्ये सुनील ग्रोव्हरसह सतीश शाह, सपना पब्बी, निखिल विजय, मनु ऋषी चढ्ढा, नयनी दीक्षित आणि नीलू कोहली देखील आहेत. सुनील ग्रोव्हर स्टारर 'युनायटेड कच्चे' 31 मार्च रोजी Zee5 वर प्रदर्शित होणार आहे. ही वेबसीरीज प्रेक्षकांना खळखळून हसवलं यात शंका नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप

Swati Maliwal Assault Case : 'माझ्याबाबत जे घडलं ते,...; मारहाणीच्या घटनेनंतर आप नेत्या स्वाती मालीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

Mega block : मध्य रेल्वेवर आजपासून पंधरा दिवस ब्लॉक; कोणत्या मार्गांवर होणार परिणाम? जाणून घ्या

Maharahstra Election: अजित पवार गेले कुठे? अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचाराकडे पाठ?

SCROLL FOR NEXT