Sara Ali Khan Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sara Ali Khan: मी सारा अली खान... ; मराठी भाषेत बोलताच टाळ्या आणि शिट्ट्या वाजल्या, VIDEO व्हायरल

Priya More

Zee Chitra Gaurav Awards 2024:

'झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा 2024' (Zee Chitra Gaurav Awards 2024) नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक कलाकारांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यंदाच्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) हजेरी लावली. पारंपरिक लूकमध्ये सारा खूपच सुंदर दिसत होती. यावेळी साराने सर्वांशी मराठीमध्ये संवाद साधला. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'झी चित्र गौरव पुरस्कार 2024' या सोहळ्यामध्ये सारा अली खान कॉफी कलरची डिझायनर साडी नेसून आली होती. तिने कानामध्ये मोठे झुमके, लाइट मेकअप आणि केसाचा बन करून आपला लूक परिपूर्ण केला होता. सारा अली खान या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. यावेळी साराने सर्वांसोबत मराठीमध्ये संवाद साधला. ती मराठीमध्ये खूपच छान बोलताना दिसली.

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यातील सारा अली खानचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी सारा म्हणते की, 'नमस्ते प्रेक्षकहो, मी सारा अली खान. मला इथे येऊन वाटते खूप छान. झी मराठी आहे महाराष्ट्राची शान, काय पाहुणं आला का बाण.' साराच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दरम्यान, या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने देखील हजेरी लावली. यावेळी शिल्पा शेट्टीने पांढऱ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती. शिल्पा शेट्टीने मोकळे केस, गळ्यात मोत्याचा नेकलेस, नाकामध्ये नथ, लाईट मेकअप करत लूक परिपूर्ण केला होता. शिल्पा शेट्टीचा मराठमोळा अंदाज खूपच भारी होता. तिच्या सौंदर्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. यावेळी शिल्पा शेट्टीने नटरंग चित्रपटातील 'वाजले की बारा' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. यावेळी तिच्या अदा पाहून प्रेक्षक चकीत झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT