Zali Daina Song You Tube
मनोरंजन बातम्या

Zali Daina Promo: प्रेक्षकांना थिरकायला लावणारं 'झाली दैना रं...' कोळीगीताचा प्रोमो रिलीज

Zali Daina Released Soon: अंकिता राऊत व सुशांत पुजारी यांचं 'झाली दैना' हे कोळीगीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Chetan Bodke

Zali Daina Promo

आजवर मराठी कोळीगीतांनी रसिक प्रेक्षकांच्या दिलावर राज्य केलं आहे. कोळीगीत आणि प्रेक्षकांचा डान्स हे समीकरणच झालं आहे. सणसमारंभ असो वा लग्नसोहळा असो कोळीगीत वाजली नाहीत असं होणं शक्य नाही. अशातच नवनवीन कोळीगीत रसिक प्रेक्षकांच्या दिलाचा ठेका चुकवायला येतंच असतात. यांत एका रापचिक कोळीगीताने भर घातली असून हे गाणं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायाला सज्ज होत आहे.

अंकिता राऊत व सुशांत पुजारी अभिनीत इश्काची पुरी कहाणी घेऊन येत 'झाली दैना' हे कोळीगीत प्रत्येकाला थिरकायला भाग पाडणार हे नक्की. नुकतेच या गाण्याचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोने या गाण्याची उत्सुकता अधिकच ताणून धरली आहे. 'श्री अधिकारी ब्रदर्स व 'मायबोली म्युझिक' प्रस्तुत 'झाली दैना' या गाण्यात अंकिता राऊत व सुशांत पुजारी यांचा रोमँटिक अंदाज साऱ्यांना भुरळ घालणार.

तर या दर्जेदार गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा प्रणित वणवे याने साकारली असून अमोल पारडे व प्रतीक्षा धोंगडे यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात हे गाणं स्वरबद्ध केलं आहे. तसेच या कोळीगीताच्या ओळी अमोल पारडे याने शब्दबद्ध केल्या आहेत. लवकरच हे गाणं रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या गाण्याची भुरळ घालणारा प्रोमो 'मायबोली म्युझिक चॅनल' या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाला मोठा झटका, मोठ्या नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update: राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल

Khare Shankarpali Recipe : यंदा दिवाळीला खास बनवा खुसखुशीत खारी शंकरपाळी, फक्त १० मिनिटांत रेसिपी तयार

Crime News : मामाच्या मुलीचा लग्नाला नकार, तरुण कमालीचा संतापला, चवताळलेल्या भावानं बाजारपेठेतच रक्तरंजित खेळ केला

WPL: आयपीएल ऑक्शनमध्ये मोठा बदल; खेळाडू रिटेनबाबत BCCIनं फ्रँचायझींना पाठवली गाइडलाइन

SCROLL FOR NEXT