Yudhra Trailer SAAM TV
मनोरंजन बातम्या

Yudhra Trailer : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, सिद्धांत चतुर्वेदीच्या 'युध्रा'चा दमदार ट्रेलर आऊट

Yudhra Trailer Out : सिद्धांत चतुर्वेदीच्या आगामी चित्रपट 'युध्रा'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. जबरदस्त ॲक्शन आणि थ्रिलर असलेल्या या ट्रेलरमध्ये सिद्धांतचा किलर लूक पाहायला मिळाला आहे.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र ॲक्शन चित्रपटांचा ट्रेंड सुरू आहे. सिद्धांत चतुर्वेदीचा आगामी ॲक्शन-थ्रिलर चित्रपट 'युध्रा'चा ट्रेलर (Yudhra Trailer ) रिलीज झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. जबरदस्त ॲक्शन आणि थ्रिलर असलेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सिद्धांतचा वेगळा अवतार पाहायला मिळाला आहे.

'युध्रा'चा ट्रेलर सिद्धांत चतुर्वेदीच्या (Siddhant Chaturvedi) व्हॉईस ओव्हरने सुरू होतो, तो म्हणतो- 'मी मरण्यापूर्वी मी तुम्हाला महाभारतातील एक प्रसिद्ध कथा सांगतो. चक्रव्यूहात प्रवेश करण्याचा मार्ग अभिमन्यूने आईच्या उदरातून शिकला, पण चक्रव्यूहाचे रहस्य त्याला कधीच उलघडले नाही. यानंतर सिद्धांत ॲक्शन रूपात दिसतो आणि तो म्हणतो, तुला वाटले होते की मी अभिमन्यू आहे, पण मी त्याचा पिता अर्जुन आहे. ट्रेलरमध्ये तो अभिनेत्री मालविका मोहननसोबत (Malavika Mohanan) रोमान्स करताना दिसत आहे.

'युध्रा' कधी रिलीज डेट?

'युध्रा' रवी उदयवार दिग्दर्शित 'युध्रा' चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. हा थ्रिलर 'युध्रा' चित्रपट 20 सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदीसोबतच मालविका मोहनन, गजराज राव, राघव जुयाल, राम कपूर, राय अर्जुन आणि शिल्पा शुक्ला हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. किलनंतर राघव जुयाल पुन्हा एकदा ॲक्शन अवतारात दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : उत्साहात दिवस जाईल, ५ राशींच्या व्यक्तींना धनलाभ होणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Rain Alert : पुढील ८ ते ४८ तासांत कोकण-गोव्यासह १९ राज्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अलर्ट

Mens Health : पुरुषांच्या लघवीतून रक्त येणे हे गंभीर आजाराचे लक्षण आहे? वेळीच व्हा सावध अन्यथा...

Maharashtra News Live Update: नीट पेपरप्रकरणी पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

जयश्री नागे आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; नवऱ्याला ७ वर्षांचा तुरुंगवास, सासरच्या मंडळीची निर्दोष मुक्तता, कोर्टात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT