first songs 'ji huzoor' of the film Shamshera Saam Tv
मनोरंजन बातम्या

'शमशेरा'चं पहिलं जबरा गाणं 'जी हुजूर' रीलीज; मुलांसोबत नाचला रणबीर कपूर

यशराज फिल्म्सने बुधवारी 'शमशेरा' चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले. यामध्ये रणबीर कपूरच्या मुलांसोबत जबरदस्त दमदार डान्स पाहायला मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचा रॉकस्टार रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) आगामी 'शमशेरा'(Shamshera) चित्रपटातील 'जी हुजूर' हे पहिलं गाणे रीलीज झाले आहे. या गाण्यात रणबीर लहान मुलांसोबत डान्स करताना दिसत आहे. त्याच्या डान्स स्टेप्स आणि एनर्जी पाहून तुम्हीही प्रभावित व्हाल. रणबीर त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.

यशराज फिल्म्सने रीलीज केलेल्या 'जी हुजूर' या गाण्यामध्ये रणबीर कपूर हा वरून उडी मारून खाली येतो आणि गाण्याला सुरुवात होते. तिथे लहान मुलं त्याला घेरतात. गाण्यातील सर्व मुलं रणबीरच्या स्टेप्सची कॉपी करताना दिसत आहेत. हे गाणे आदित्य नारायणने शादाब फरीदीसोबत गायले आहे. या गाण्याचे बोल मिथुनने संगीतबद्ध केले असून, मिथुननेच या गाण्याची निर्मिती केली आहे. चिन्नी प्रकाशने या नृत्यदिग्दर्शन केले आहे.

'जी हुजूर'ला मिळतोय चांगला प्रतिसाद

'जी हुजूर' रीलीज होताच या गाण्यानं धम्माल उडवून दिली आहे. चाहते या गाण्याचे कौतुक करत आहेत. रीलीज होताच या गाण्याला ज्याप्रकारे जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता हे गाणं चाहते डोक्यावर उचलून धरतील, यात शंकाच नाही, असे बोलले जात आहे. या चित्रपटात रणबीरच्या भूमिकेबद्दल आधीपासूनच जोरदार चर्चा आहे.

२२ जुलैला प्रदर्शित होणार शमशेरा

शमशेरा या चित्रपटात रणबीर कपूरसोबत संजय दत्त, वाणी कपूर, रोनित रॉय बोस, आणि सौरभ शुक्ला हे कलाकार महत्वाची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची घोषणा २०१८ मध्ये करण्यात आली होती. हा चित्रपट आता २२ जुलै २०२२ रोज हिंदी ,तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.

रणबीर कपूरसाठी २०२२ हे वर्ष आहे खूप खास

चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी रणबीर कपूर म्हणाला की, २०२२ हे वर्ष त्याच्यासाठी खास आहे. याचवर्षी त्याने आलिया भट्टसोबत लग्न केले. आलिया आणि रणबीर या वर्षी आई-बाबा होणार आहेत. तसेच आलिया सध्या लंडनमध्ये तिच्या हॉलिवूड डेब्यू चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन'चे देखील शूटिंग करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking With Music: चालताना गाणी ऐकावीत की शांतपणे चालावे? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर?

Kitchen Hacks : गॅस पेटवण्याआधी करा हे १ काम, LPG सिलेंडर चालेल १५ दिवस जास्त

Diwali Vacation : दिवाळीत प्लान करा फॉरेन ट्रिप, थायलंडच्या निसर्ग सौंदर्याचा घ्या आनंद; ७ दिवसांत फिरा सुंदर बीच, मंदिरे अन् बेटं

Maharashtra News Live Update: नांदेडकरांनी घेतला चित्तथरारक घोडेस्वारी प्रदर्शनाचा आनंद

Winter Skin Care: हिवाळा सुरू होण्याआधी स्किन केअरमध्ये करा हे ७ बदल; त्वचा होईल मुलायम आणि चमकदार!

SCROLL FOR NEXT