Shah Rukh Khan Meeting His Fans Saam TV
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: शाहरुखने बाल्कनीत जाण्यामागील गुपित उलगडलं, वडिलधाऱ्यांनी दिलेली 'ही' शिकवण विसरला नाही...

शाहरुखचे अनेक लाखो चाहते आहेत जे त्याची एक झलक पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. त्याच्या बाल्कनीत येण्यामागील कारण नुकतेच त्याने एका मुलाखतीत सांगितले.

Chetan Bodke

Shah Rukh Khan: शाहरुख खानने तब्बल चार वर्षांनंतर 'पठान' या स्पाय-थ्रिलर चित्रपटातून रुपेरी पडद्यावर दमदार कमबॅक केले. या चित्रपटाने अनेक बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटांचे विक्रम तोडत दमदार कमाई केली. 'पठान' हा २०२२ या वर्षातला बक्कळ कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. शाहरुखचे अनेक लाखो चाहते आहेत जे त्याची एक झलक पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. त्याच्या बाल्कनीत येण्यामागील कारण नुकतेच त्याने एका मुलाखतीत सांगितले.

एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, पठानला मिळालेल्या घवघवीत यशानंतर, किंग खान (शाहरुख खान) त्याच्या 'मन्नत'बंगल्याच्या बाहेर बाल्कनीमध्ये आला होता. शाहरुख खान अनेकदा त्याच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना आपल्या आयकॉनिक स्टेप करुन दाखवतो. याबाबत शाहरुखने आपल्या चाहत्यांसोबत या मागील खास कारण शेअर केले आहे.

शाहरुख म्हणतो, "माझा चित्रपट हिट नसतानाही चाहते मला नेहमीच खूप प्रेम देतात. माझ्या घरातील वडीलधाऱ्यांनी मला एकदा सांगितले होते की, जेव्हा जेव्हा तुला वाईट वाटेल तेव्हा ज्या व्यक्तींकडून तुला भरपूर प्रेम मिळते त्यांच्याकडे जा. आपल्या आयुष्यात अनेक वाईट आणि चुकीच्या गोष्टी होतात तसेच चांगले दिवस आणि वाईट दिवस येतात आणि जातात."

सोबतच पुढे शाहरुख म्हणतो, "तुम्ही ज्यांच्यासोबत काम करता त्यांच्याकडे जाऊ नका, जे तुम्हाला काम चांगले कसे करायचे ते सांगतात त्यांच्याकडे जाऊ नका. तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या लोकांकडे जा. मी खूप भाग्यवान आहे की मला वाईट काळात साथ देणारे लाखो लोकं आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा मला वाईट वाटते तेव्हा मी माझ्या बाल्कनीत जातो. जेव्हा मी आनंदी असतो तेव्हा मी माझ्या बाल्कनीत जातो. देवाने माझ्यावर इतका विश्वास दाखवला आहे की त्याने मला नेहमीच बाल्कनीचे तिकीट देऊ केले आहे."

शाहरुख खानच्या बाल्कनीचे सीन्स त्याच्या 'फॅन' चित्रपटात अनेक वेळा दाखवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT